पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५३ वैदिक तत्त्वमीमांसा मी जेवीत नाही किंवा तृप्ति अनुभवीत नाहीं, असें ह्मटलें असतां त्याचे हे ह्मणणे जितकें विश्वसनीय होईल तितकेंच, ज्याला इंद्रियांच्या द्वारे बाह्य वस्तूंचा प्रत्यक्ष अनुभव येत आहे, त्याने मला बाह्य वस्तूंचा अनुभव येत नाहीं व बाह्य वस्तु विद्यमान नाहींत असे झटलें असतां,-याचे हे ह्मणणे विश्वसनीय होईल. या संबंधाने विज्ञानवादी कदाचित् असें ह्मणेलं की, कोणतीच वस्तु माझ्या अनुभवाला येत नाही असे मी । ह्मणत नाहीं; तर मी एवढेच ह्मणतों कीं, विज्ञानाहून भिन्न अशी कोणतीही वस्तु माझ्या अनुभवाला येत नाहीं. याला ( शंकराचार्यांचे ) उत्तर असें कीं, होय, तू असे ह्मणतोस हे खरे. परंतु ते सयुक्तिक आहे ह्मणून तू तें ह्मणत नाहींस; तर तुझ्या तोंडाला कांहीं निबंध नाहीं ह्मणून. कारण अनुभवाच्या योगानेच अपरिहार्य रीतीने असे सिद्ध होते की, अनुभवाचा विषय जो बाह्य पदार्थ तो अनुभवाहून भिन्न असतो. अनुभव ह्मणजेच स्तंभ किंवा भिंत अशी कोणालाही प्रतीति येत नाही. तर, उलट, आपल्या अनुभवाचे विषय या अर्थीच सर्वांना स्तंभ किंवा भिंत या विषयीं ज्ञान प्राप्त होते. सर्वांना असेच ज्ञान प्राप्त होते, या विधानाचे समर्थन करण्याला एक कारण असे कीं, बाह्य पदार्थ विद्यमान नाहीत असे जे प्रतिपादन करितात ते देखील असे ह्मणतात की, अंतस्थं जो ज्ञानरूप विषय तो बाह्य पदार्था सारखा दिसतो. कारण या वरून असे सिद्ध होते की, सर्व लोकांना माहीत असा जो बाह्य पदार्थांचा अनुभव तोच अनुभव त्यांना देखील