पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १४९ ज्ञान, पटज्ञान, इत्यादि ज्ञानांचे त्यांच्या विषयांच्या संबंधानें जे परस्परांहून भिन्नत्व असते ते त्यांचे त्या त्या पदार्थाशीं सारूप्य असल्या मुळेच असते. परंतु प्रतिपक्षाने प्रतिपादित जे बाह्य पदार्थ त्यांचे जें रूप तेच तद्विषयक ज्ञानांचे रूपं, असें कबूल केलें ह्मणजे तेवढ्यानेच व्यवहार सिद्ध होऊ शकतो. आणि ह्मणून ज्ञानांहून भिन्न अशा बाह्य पदार्थांच्या विद्यमानतेची कल्पना करण्याची आवश्यकता राहत नाही. या सर्व विवेचना वरून असे सिद्ध होते की, जें कांहीं विद्यमान आहे ते सर्व विज्ञानरूप आहे. अर्थात्, बाह्य पदार्थ विद्यमान नाहींत.'