पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य |१३७ विद्यमान वस्तू विषयीं होतो; त्या अर्थी आपल्या अनुभवाला येणा-या सर्व वस्तु भ्रांतिरूप आहेत असे जरी मानिले; तरी त्या भ्रमरूप वस्तूंच्या मूळाशीं, जी पारमार्थिक दृष्टीने सत्य अशी, कांहीं तरी वस्तु आहे असे मानले पाहिजे. परंतु असेही ह्मणतां येणार नाही. कारण ज्या प्रमाणे दोष, जिच्या मध्ये दोष आहे ती वस्तु, व जो दोष जाणितो तो, हे सर्व पारमार्थिक दृष्टीने अभावरूप असून देखील भ्रम उत्पन्न होतो; त्या प्रमाणेच मूळाशीं परमार्थदृष्टीने कोणतीही सत्य वस्तु नसून देखील भ्रम उत्पन्न होऊ शकेल. या वरून असे सिद्ध होते की, अंतर्बाह्य सर्व जग शून्यस्वरूप आहे.' | शून्यवादरूप में मत शंकराचार्य व रामानुजाचार्य या दोघांनाही मान्य नाही. कारण रामानुजाचार्यांनी असे झटकें आहे कीं:-इति प्राप्ते उच्यते ।.... सर्व-शून्यत्वं च भवत्अभिप्रेतं न संभवति । किं भवान् सर्वं सत् इति वा प्रतिजानीते, असत् इति वा, अन्यथा वा । सर्वथा तव अभिप्रेतं तुच्छत्वं न संभवति । लोके भाव–अभाव-शब्दयोः तत्-प्रतीयोः च विद्यमानस्य एव वस्तुनः अवस्था—विशेषगोचरत्वस्य प्रतिपादितत्त्वात् । अतः सर्वे शून्यं इति प्रतिजानता, सर्व सत् इति प्रतिजानता इव, सर्वस्य विद्यमानस्य अवस्था-विशेष्य योग्यता एव प्रतिज्ञाता भवति । इति भवत्-अभिमता तुच्छता न कुतःचित् अपि सिध्यति । किंच कुतःचित् प्रमाणात् शून्यत्वं उपलभ्य शून्यत्वं सिषा ( १ ) अन्यथा वा किं उभयात्मकत्वेन उत अनुभयात्मकत्वेन इत्यर्थः ॥