पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १३५ अधिष्ठान-अपारमायें अपि भ्रम -उपपत्तेः । अतः शून्य एव तत्त्वम् ।। ( श्रीभाष्य, २।२।३० ) ह्मणजे, “ शून्यवादि असे प्रतिपादन करितात की, बाह्य जग विद्यमान नाहीं आणि अंतस्थ जगही विद्यमान नाहीं. जें कांहीं विद्यमान आहे ते तत्त्वतः शून्य ह्मणजे अभावरूप आहे. आणि अभाव प्राप्त होणे ह्मणजे मोक्षप्राप्ति. हेच मत सयुक्तिक आहे असे मानले पाहिजे. कारण शून्यरूप अभावाची कोणत्याही कारणाने उत्पत्ति होणे शक्य न सल्या मुळे तो स्वतःच सिद्ध आहे. जे भावरूप असेल, त्याच्या कारणा विषयीं, ह्मणजे ते उत्पन्न कसे झालें या विषयीं, विवरण करणे आवश्यक असते. या करितां भावरूप असे कांहीं विद्यमान आहे, अशी जर कल्पना केली तर, ते उत्पन्न कसे झाले, या विषयीं उपपत्ति ठरविली पाहिजे. परंतु ते भावा पासून ह्मणजे सत्-रूप अशा वस्तू पासून उत्पन्न झाले असे मानतां येणार नाहीं, किंवा तें अभावा पासून ह्मणजे असत्-रूप अशा वस्तू पासून उत्पन्न झाले असेही मानितां येणार नाही. कारण भावा पासून कोणतीही सत्-रूप वस्तु उत्पन्न होते, असा आपला अनुभव नाहीं. मृत्तिकेच्या पिंडा पासून घट उत्पन्न होतो असे आपण ह्मणतों खरे; तथापि मृत्तिकेचा पिंड नष्ट झाल्या शिवाय घट उत्पन्न होत नाही. तसेच, भावरूप अशी कोणतीही वस्तु अभावा पासून उत्पन्न होणे शक्य नाहीं. कारण नष्ट झालेला जो मृत्तिकेचा पिंड तद्रूप अभात्रा पासून घट उत्पन्न होतो असे मानले, तर अभावा। पासून उत्पन्न होणारा जो घट तो देखील अभ.वरूपच