पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३२ वैदिक तत्त्वमीमांसा आणि ज्या अर्थी शंकराचार्य व रामानुजाचार्य यांनी वरील गोष्टींचे स्पष्टपणे प्रतिपादन केले आहे, त्या अथीं त्यांच्याच मते श्रुतीच्या प्रामाण्याचे क्षेत्र किती संकुचित आहे, व प्रत्यक्षादि लौकिक प्रमाणांच्या उपयुक्ततेचे क्षेत्र किती विस्तृत आहे, हे सहज ध्यानात येईल. या करितां शंकराचार्य, रामानुजाचार्य, व त्यांचे अनुयायी यांचा एक पक्ष, आणि दुसरा अनुमानवादी पक्ष, यांच्या मधील वादविवादाचा मुख्य प्रश्न असा असतां नये कीं, श्रुतिग्रंथ ईश्वरप्रणीत आहेत किंवा नाहींत ? तर, घूर्वी निर्दिष्ट केल्या प्रमाणे, तो प्रश्न एवढाच असला पाहिजे की, तत्वज्ञानविषयक ज्या मताचे श्रुतिग्रंथां मध्ये निरूपण केलेले आहे असे शंकराचार्य किंवा रामानुजाचार्य प्रतिपादन करतात, ते मत अनुमानवादी पक्षाला ग्राह्य होण्या सारखे आहे किंवा नाही ? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्या करितां, शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या मते श्रुतिग्रंथां मध्ये तत्त्वज्ञानविषयक कोणत्या मताचे निरूपण केलेले आहे ? या प्रश्न विषयों प्रथम विवेचन केले पाहिजे. आणि हे विवेचन स्पष्टपणे समजण्या करितां, शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या मते श्रुतीला तत्त्वज्ञानविषयक कोणती मते मान्य नाहींत,-ह्मणजे त्यांनी तत्त्वज्ञानविषयक कोणत्या मतांचे खंडन केले आहे, या प्रश्ना विषयी विवेचन केले पाहिजे. ह्मणून आपण आता त्या प्रश्नाकडे वळू. (१) वरील पृष्ठ ९४ पहा.