पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य । १३१ करितात; तरी ते प्रत्यक्षादि लौकिक प्रमाणांचा तिरस्कार करीत नाहीत. कारण, वरै स्पष्ट करून सांगितल्या प्रमाणे, ते असे ह्मणतात किंवा प्रतिपादन करितात की:-(१) जर केाणी तोच सिद्धांत श्रुतीच्या साहाय्या शिवाय केवळ प्रत्यक्षादि लौकिक प्रमाणांच्या योगाने सिद्ध करून दाखवील तर त्या विषयी त्यांची काही हरकत नाहीं; (२) वेदांत मताशी असंमत नाही असा जे केवळ प्रत्यक्षादि लौकिक प्रमाणांच्या योगाने स्थापन केलेल्या मतांचा भाग तो ग्राह्यच आहे; (३) वेदांत मताचा वर निर्दिष्ट केलेला मुख्य सिद्धांत केवळ प्रत्यक्षादि लौकिक प्रामाणांच्या योगाने सिद्ध केला जाणे शक्य नाही, असे त्याच प्रमाणांच्या साहाय्याने सिद्ध होते; (४) वेदांत मताच्या विरुद्ध अशी जी मते त्यांचे केवळ प्रत्यक्षादि लौकिक. प्रमाणांच्या योगाने निराकरण करितां येते, व ते केले पाहिजे; (५) वेदांत मता विरुद्ध प्रत्यक्षादि प्रमाणांच्या आधाराने जे आक्षेप घेतले जातात त्यांचे त्याच प्रमाणांच्या योगाने निराकरण करितां येतें, वे ते केले पाहिजे; किंवा वेदांत मत, केवळ प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगाने सिद्ध होणारे जे सिद्धांत, त्यां पैकी कोणत्याही सिद्धांताच्या विरुद्ध नाही, असे त्याच प्रमाणांच्या साहाय्याने दाखविता येते, व ते दाखविले पाहिजे; आणि (६) श्रुतिवचनांचा अर्थ व तात्पर्यार्थ समजून वेदांत मताचे सिद्धांत निश्चित करण्या करितां देखील प्रत्यक्षादि लौकिक प्रमाणांचे साहाय्य आवश्यक आहे. (१) वरील पृष्ठ ९१-९४ पहा.