पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| ११८ ११८ वैदिक तत्त्वमीमांसा भाष्य १।१।३ ) ह्मणजे, 'जग हे कार्य असल्या मुळे, तें कार्य उत्पन्न करण्याला साधनीभूत असे जे द्रव्य, उपकरण, संप्रदान, व प्रयोजन यांच्या विषयीं ज्याला ज्ञान आहे, असा कर्ता व जगरूप कार्य यांच्या मध्ये साहचर्य असते. आता जग हें सावयव असल्या मुळे ते कार्य आहे ही गोष्ट कोणा| लाही नाव.बूल करता येणार नाही. या संबंधाने कदाचित् । असा आक्षेप घेतला जाईल की, ज्या वस्तु सावय असतात त्यांच्या ठिकाणी, त्यांच्या सावयवत्वा शिवाय आणखी दुसर कोणताही असा विशेष धर्म आढळत नाहीं की, त्याच्या योगाने या ( झणजे सावयव ) वस्तु मात्र कार्ये आहेत, दुसन्या ( ह्मणजे सावयव नव्हत अशा ) वस्तु कायें नाहींत, | असे निश्चित होते; उलट पक्षी, कोणतीही वस्तु कार्य आहे असे निश्चित करण्या करितां, ती कार्यरूप वस्तु उत्पन्न करण्याची, व ती वस्तु उत्पन्न करण्याला साधनीभूत अशी जी द्रव्य, उपकरण, वगैरे साधने ती जाणण्याची, शक्यता दिसून आली पाहिजे. परंतु हा आक्षेप निराधार आहे. कारण ज्या प्रमाणे कोणतीही वस्तु कार्य आहे असे प्रत्यक्ष पाहिल्या नंतर, त्या वस्तूच्या कर्त्या विषयी अनुमान करितां येऊन, त्या कर्या मधील ज्ञान व सामथ्ये यांचे देखील त्या काय वरूनच अनुमान करितां येते; त्या प्रमाणेच दुसरी एकादी वस्तु सवयव आहे असे माहीत झाल्या बरोबर, ती काय आहे असे प्रथम निश्चितपणे अनुमान करितां येऊन, नंतर त्या वस्तूचा कर्ता आणि त्या कर्या मधील ज्ञान छ सामर्थ्य, या गोष्टी निश्चित होतात. अर्थात् , या दोहों मध्ये काहीं भेद नाहीं. उदाहरणार्थ, घ, कलश वगैरे वस्तु उत्पन्न