पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११६ । वैदिक तत्त्वमीमांसा । ज्ञान ते प्रत्यक्ष ज्ञान कसे असू शकेल ? परंतु पूर्वी ज्या वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त झालेले नाही अशा वस्तूचे जर योगाच्या द्वारे ज्ञान प्राप्त झालेच, तर योगाच्या द्वारे ज्ञान प्राप्त होण्याचे जे कारण (ह्मणजे पूर्वी अनुभविलेल्या विषयाची स्मृति), तें अविद्यमान असल्यामुळे त्याच्या अभावीं उत्पन्न होणारे जे ज्ञान ते भ्रमरूपच होय. तसेच, ब्रह्मविषयक ज्ञान अनुमानाच्या योगाने प्राप्त होणे शक्य नाही. कारण अनुमान दोन प्रकारचे असते. एक * विशेषतः दृष्ट ,-ह्मणजे दोन वस्तु मध्ये कार्यकारणभावरूप संबंध आहे असे पूर्वी पाहून नंतर त्यां पैकी एका वस्तू पासून दुसरीचे अनुमान करणे; व दुसरें सामान्यतः दृष्ट,-ह्मणजे दोन वस्तू मध्ये कार्यकारणभावरूप संबंध नसला तरी त्यांच्या मध्ये साहचर्यरूप संबंध आहे असे पूर्वी पाहून नंतर त्यां पैकी एका वस्तू पासून दुसरीचे अनुमान करणे. आतां यां पैकी पहिल्या प्रकारच्या अनुमानाने ब्रह्मविषयक ज्ञान प्राप्त होणे शक्य नाही. कारण ( पूर्वी सिद्ध केल्या प्रमाणे ) ब्रह्म इंद्रियगोचर नसल्या मुळे, जगरूप कार्य व ब्रह्मरूप कारण, यांच्या मधील कार्यकारणभावरूप संबंध ( प्रत्यक्षाच्या योगाने ) जाणिला जाणे शक्य नाही. आतां ( ज्या प्रमाणें । पृथ्वीशी गंधाचे साहचर्य असल्या मुळे, गंध हैं पृथ्वीचें। व्यंजकं किंवा लिंग होऊन त्या पासून पृथ्वीचे अनुमान करितां येते; त्या प्रमाणे ) ज्या वस्तूचे परमात्म्याशी साहचर्य आहे अशी वस्तु जर उपलब्ध असती, तर ती त्याचे लिंग होऊन त्या पासून सामान्यतः दृष्ट' या अनुमानाच्या योगानें परमात्मविषयक ज्ञान प्राप्त झाले असते. परंतु सर्व