पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य | ११५ जिव्हा, त्वचा यांच्या ) योगानें जें ज्ञान प्राप्त होते ते त्या त्या इंद्रियाचा जो स्वाभाविक विषय त्याचे,—तो विषय च ते इंद्रिय यांचा वस्तुतः संयोग झाला ह्मणजे-होते. असे असल्या मुळे, सर्व वस्तु प्रत्यक्षतः पाहण्याला व सर्व वस्तु उत्पन्न करण्याला समर्थ, असा जो पुरुषोत्तमरूप । विशिष्ट विषय, त्याच्या विषयी बाह्यद्रियरूप प्रत्यक्षाच्या योगाने ज्ञान प्राप्त होणे शक्य नाही. तसेच, अंतरेंद्रियरूप प्रत्यक्षाच्या ह्मणजे मनाच्या योगाने में ज्ञान प्राप्त होणे शक्य नाही. कारण सुख दुःख बगैरे जे मनोविकार किंवा ज्या मनोवृत्ति, त्यांच्याहून भिन्न असे जे बाह्य विषय, ते बायेंदियांच्या द्वारेच अंतरंद्रियाचे ह्मणजे मनाचे विषय होऊ शकतात. (अर्थात्, ब्रह्म हें सुखदुःखादि ज्या मनोवृत्ति त्यांच्याहून भिन्न असून ते बायेंद्रियांचा विषय नसल्या मुळे, मनरूप प्रत्यक्षाच्या योगाने देखील ब्रह्मविषयक ज्ञान प्राप्त होणे शक्य नाहीं. ) त्या प्रमाणेच, योगरूप प्रत्यक्षाच्या द्वारे देखील ब्रह्मविषयक ज्ञान प्राप्त होणे शक्य नाही. कारण योगाच्या द्वारे प्राप्त होणारे ज्ञान ह्मणजे भावनाशक्तीच्या किंवा कल्पनाशक्तीच्या तीव्रतेची जी पराकाष्ठा तिच्या पासून उत्पन्न होणारे ज्ञान. आणि जरी हे ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञाना इतकेच अत्यंत स्पष्ट असले तरी ते, आपणांला पूर्वी ज्या वस्तूचा अनुभव आलेला आहे ( ह्मणजे पूर्वी या वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त झालेले आहे ) अशा तस्तूची केवळ स्मृति होय. आणि असे असल्या मुळे योग हैं ज्ञानप्राप्तीचे स्वतंत्र साधन नव्हे हे उघड आहे. आणि ज्या अर्थी योग में ज्ञानप्राप्तीचें। स्वतंत्र साधन नव्हे, त्या अर्थी योगा पासून उत्पन्न होणारे जें