पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ११३ झणजे, * रूप, रस, गंध, स्पर्श, ध्वनि हे जे पांच इंदियांचें पांच विषय, त्यां पैकी कोणताही ब्रह्मा मध्ये नसल्या मुळे, ते इंद्रियरूप जें प्रत्यक्ष प्रमाण त्याच्या योगानें ज्ञेय नाही. तसेच, अनुमानादि प्रमाणांच्या योगानें ज्ञेय होण्याला आवश्यक अशी जी लिंगादि साधने ती ब्रह्मा मध्ये नसल्या मुळे, ते अनुमानादि प्रमाणांच्या योगाने देखील ज्ञेय नाहीं. हीच गोष्ट,-ह्मणजे प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगाने ब्रह्मविषयक ज्ञान प्राप्त होणे शक्य नाहीं । ही गोष्ट,-समानुजाचार्यांनी पुढील विचारसरणीनें विस्त रशः प्रतिपादन केली आहे. * रामानुजाचार्यांनी अनुमानवादी पूर्वपक्षाचे ह्मणणें प्रथम दिळे आहे. ते असेंः–जगत्-जन्मादि-कारणं ब्रह्म वेदान्त बेचं इति उक्तम् । तत् अयुक्तम् । तत् हि न वाक्यप्रतिपाद्यं, अनुमानेन सिद्धेः ॥ ( श्रीभाष्य, १।१।२ ) ननु शास्त्रयोनित्वं ब्रह्मणः न संभवति प्रमाण-अन्तरवेद्यत्वात् ब्रह्मणः । अप्राप्ते तु शास्त्रं अर्थवत् ।। ( श्रीभाष्य, १।१।३ ) ह्मणजे, ' जगाच्या उत्पत्ति-स्थिति-लयाचे कारण जें ब्रह्म ते श्रुतीच्या योगानें ज्ञेय आहे, असे जे प्रति पादन केले आहे, ते बरोबर नाही. कारण ते अनुमानादि प्रमाणांच्या योगानें ज्ञेय असल्या मुळे, त्याचे प्रतिपादन करण्याला श्रुतीची आवश्यकता नाहीं. जी वस्तु इतर प्रमाणांच्या योगाने उपलभ्य नाहीं, तिचे निरूपण करणे एवढाच श्रुतीचा हेतु होय.' अनुमानवादी प्रतिपक्षाचे हे ह्मण क्षणभर कबूल करून रामानुजाचार्य असे विचारतात की-किं तर्हि तत्र