पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११६ वैदिक तत्त्वमीमासा . ( १० ) * (५) ब्रह्यविषयक ज्ञाना संबंधानें श्रुतिच प्रमाणभूत मा. निली पाहिजे, असे जे शंकराचार्य व रामानुजाचार्य प्रतिपादन करितात, ते दोन कारणां करितां. एक कारण असे की, श्रुतिग्रंथां मध्ये ब्रह्मविषयक ज्ञान उपलभ्य असून ते ज्ञान निर्दोष आहे, त्याच्या विरुद्ध कोणताही आक्षेप घेतला जाणे शक्य नाही. दुसरे कारण असे की, चित्स्वरूप ब्रह्म हे जगाचे निमित्त-कारण व उपादान–कारण असें जें श्रुतीच्या योगाने ज्ञान प्राप्त होते, ते ज्ञान प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगानें प्राप्त होणे शक्य नाहीं. आणि या संबंधाने आतां शेक्टी लक्षात ठेवावयाची गोष्ट ही का, प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगाने में ज्ञान प्राप्त होणे शक्य नाही, असे जे ते विधान करितात, ते ते अंध अद्धन करीत नाहीत, तर अनुमानादि प्रमाणांच्या साहाय्यानेच करतात. ह्मणजे अनुमानादि प्रमाणांच्या साहाव्यानेच ते असे प्रतिपादन करितात की, जगाच्या उत्पत्ती संबंधाने ज्या सिद्धांताचे श्रुती मध्ये निरूपण केलेले आहे तो सिद्धांत, किंवा त्या सिद्धातांत समाविष्ट झालेले ब्रह्म, प्रत्यक्षादि प्रमाणांच्या योगाने सिद्ध होणे सर्वथैक अशक्य आहे, | शंकराचार्य व रामानुजाचार्य यांनी ज्या विचारसरणीच्या योगाने में प्रतिपादन केले आहे, तिचा मुख्य भाग शंकराचार्यांच्या पुढील वाक्यांत आहेः-रूपादिअभावात् हि न अयं अर्थः प्रत्यक्षगोचरः, लिंगादि । वीत् च न अनुमानादीनाम् ।। ( शारीरकभाष्य, २।१।११)