पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य १११ साहाय्यं आत्मनः दर्शयति । ( शारीरकभाष्य, १।१।२ } झणजे, * विचाराच्या योगानें प्राप्त होणारा जो श्रुतीतील वचनांच्या तात्पर्याचा निर्णय त्याच्या योगानेच ब्रह्म विषयक ज्ञान प्राप्त होणे शक्य आहे, केवळ अनुमानादि प्रमाणांच्या योगाने ते प्राप्त होणे शक्य नाही. परंतु जगाच्या उत्पत्ति-स्थिति-लयाच्या कारणाचे निरूपण करणारीं श्रुति-वचनें आधाराला असलीं, ह्मणजे मग त्यांचा तात्पर्यार्थ समजण्या करितां व त्या तात्पर्याथच्या दृढीकरणा करितां उपयुक्त, व श्रुतींतील वचवांच्या विरुद्ध नाहीं या अर्थी प्रभाणभूत, असे जे अनुमान त्याचे अवलंबन करण्याला हरकत नाहीं. इतकेच नव्हे, तर ब्रह्मज्ञाना संबंधानें तर्काचे साहाय्य घ्यावे असा श्रुतीचाच आदेश आहे. उदाहरणार्थ, “ब्रह्मा विषय श्रवण किंवा अध्ययन् करावे, मनन करावे " इत्यादि श्रुतिवचनां वरून असे सिद्ध होते की, श्रुतीला ( ह्मणजे श्रुतिवचनांचा अर्थ समजण्याला व दृढ होण्याला ) मनुष्याच्या बुद्धीचे साहाय्य आवश्यक आहे.' । । ' - -- -