पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य |१०९ प्रसाधितं एतत् अधिकं असंसार ब्रह्म जगत्-कारणं....इति । सत्यं प्रसाधितं, तस्य एव तु स्थूणा-निखननवत् फलद्वारेण आक्षेप-समाधाने क्रियेते दाढ्याय ।। (शारीरकभाष्य, ३।४।२) झणजे, * शंका अशी की, जीवात्म्याहून भिन्न असे जे संसाररहित ब्रह्म ते जगाचे कारण, असे या ग्रंथाच्या पूर्व भागा मध्ये ठिकठिकाणी सिद्ध केले आहे. तर मग आतां काय राहलें ? या शंकेचे निराकरण असे की, जरी पूर्वी हा सिद्धांत स्थापित केला आहे तरी, ज्या प्रमाणे जमिनींत पुरावयाचा खांब खचण्याने अधिक घट्ट पुरिला जातो, त्या प्रमाणेच पूर्वी सिद्ध केलेला जो सिद्धांत त्याच्या वरील आपली श्रद्धा दृढ करण्या करितां, त्याच्या फळा संबंधाने जे आक्षेप घेतले जातात ते सांगून त्यांचे निराकरण केले पाहिजे.' तिसरे असे की, परकीय मतांचे खंडन करणे व स्वकीय मता विरुद्ध घेतले जाणारे जे आक्षेप त्यांचे निराकरण करणे, या विषयांची वर निर्दिष्ट केलेली आवश्यकता जरी एकीकडे ठेविली, व त्या मुळे अनुमानादिकांचे अवलंबन करण्याच्या आवश्यकते विषयी वर निर्दिष्ट केलेली दोन्ही कारणे नष्ट झाली; तथापि बेदांत मत काय आहे, हे समजून घेण्या करितां देखील अनुमानादिकांचे अवलंबन केले पाहिजे, असे शंकराचार्यांनी प्रतिपादन केले आहेः—न धर्मजिज्ञासायां इव श्रृंयादयः एव • प्रमाणं ब्रह्म जिज्ञासायाम् । (१) श्रुत्यादयः इत्यादि-शब्देन लिंग-वाक्य-प्रकरण-स्थानसमाख्याः गृह्यन्ते । तत्र पद-अन्तर-निरपेक्षः शब्दः श्रुतिः । श्रुतस्य अर्थस्य अर्थ-अन्तरेण अविनाभावः लिंगम्। अन्योन्य