पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ वैदिक तत्त्वमीमासा ड्यांची उत्पत्ति झाली, अशी जी सांख्य वगैरे प्रसिद्ध मते, ती जर वेदांत दर्शनाचे जे मंदमति अनुयायी आहेत त्यांच्या कानी पडली, तर ती मते देखील स्वीकारणीय,- झणजे यथार्थ ज्ञान प्राप्त होण्याला साधनीभूते,—आहेत, असे त्यांना वाटेल. इतकेच नव्हे, तर त्या मतां मध्ये दिसून येणारे चातुर्य, गांभीर्य, व संयुक्तिकत्व पाहून, व ती मते सर्वज्ञ मुनींनीं प्रतिपादन केलेली आहेत असे ऐकून, तीच मते सत्य आहेत अशी श्रद्धा उत्पन्न होईल. तसे होऊ नये एवढ्याच करितां त्या मतांतील दोष दाखविण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. सारांश, विशाळ बुद्धीचे जे वेदांत मताचे अनुयायी असतील त्यांना स्वतः करितां जरी वेदांत दर्शना संबंधाने अनुमानादिकांचे अवलंबन करण्याची आवश्यकता नसली; तथापि त्यांचे जे अल्पबुद्धीचे धर्मबांधव त्यांच्या करितां ह्मणून तरी त्यांनी अनुमानादिकांचे अवलंबन करून वेदबाह्य मतांचे, व वेदांतर्गत मता वरील आक्षेपांचे, खंडण केले पाहिज. । दुसरे असे की, विशाळ बुद्धीचे जे वेदांत मताचे अनुयायी यांनी स्वतः करितां देखील, वेद बाह्य मते व प्रतिपक्षाने वेदांत मता विरुद्ध घेतलेले आक्षेप, यांचे अनुमानादिकांच्या योगाने निराकरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्या मानाने स्वमताच्या विरुद्ध मतांचे, व स्वमता विरुद्ध घतले जाणारे जे आक्षेप त्यांचे, आपणांला अनुमानादिकांच्या योगाने निराकरण करता येईल, त्या मानाने आपली स्वमता वरील,-अर्थात्, सत्य मता वरील,-श्रद्धा दृढ होते. आणि ह्मणूनच शंकराचार्यांनी झटले आहे:-ननु तत्र तत्र