पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

०२ वैदिक तत्त्वमीमांसा (४) परंतु या संबंधाने वैदिक धर्माचे कांहीं अनुयार्थी कदाचित् असें ह्मणतील कीं, वेदांत दर्शन काय आहे तेवढे आपणांला समजलें ह्मणजे पुरे. इतरांना तें दर्शन मान्य आहे किंवा नाही, किंवा इतर त्या दर्शना विरुद्ध कोणते आक्षेप घेतात, या विषयी आपणांला विचार करण्याची आवश्यकता नाही. अर्थात्, या मताचे तात्पर्य असे की, वेदांत दर्शनाच्या अनुयायांना या दर्शना संबंधाने अनुमानादि प्रमाणांचे अवलंबन केलेच पाहिजे असे नाही. परंतु जरी असे प्रतिपादन करणारे वेदांत दर्शनाचे कोणी अनुयायी असतील, तरी त्यांना देखील श्रुतिग्रंथां मध्ये प्रतिपादिलेल्या तत्त्वाविषयक मता संबंधाने अनुमानादि प्रमाणे टाळितां येणे शक्य नाही, असे पुढील विवेचना वरून स्पष्टपणे दिसून येईल. । कारण, एकतर, वेदांताच्या अनुयायांनी कितीही काळजी घेतली किंवा प्रयत्न केला, तरी वेदबाह्य मते किंवा अनुमानमूलक मते त्यांच्या कानी पडल्या शिवाय कधीही राहणार नाहीत. आणि या करितां जर वेदांतर्गत मत प्राह्म कां, व वेदबाह्य मते अग्राह्य कां, हे त्यांनी अनुमानादिकांच्या योगाने पूर्वीच समजून घेतलें नसेल, तर वेदबाह्य मतें अनुमानमूलक असल्या मुळे त्यां पैकी एकादें सयुक्तिक आहे, असे त्यांच्या पैकी काहींना वाटण्याचा संभव आहे. या अर्थीच शंकराचार्यांनी झटलें आहेः-ननु मुमुक्षणां मोक्ष-साधनत्वेन सम्यक् दर्शन-निरूपणाय स्वपक्षस्थापनं एव केवलं कर्तुं युक्तम् । किं परपक्ष-निराकरणेन पर-द्वेष-कण । वाढ एवम् । तथापि महाजन-परिगह