पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ९७ (३) परंतु या संबंधाने अनुमानवादी कदाचित् असे ह्मणेल की, अनुमानाने प्रतिपादन केलेल्या मतां मध्ये अनुमानमूलक दोष आढळतात, एवढ्याच करितां जर ती मते अग्राह्य; तर श्रुती मध्ये प्रतिपादन केलेल्या मता मध्ये देखील अनुमानमूलक दोष आहेत, असे दाखवितां येईल. अर्थातच, जर तसे दाखवितां आलें तर इतर मतां प्रमाणे बेदांत मत देखील अग्राह्य आहे असे कबूल केले पाहिजे. या संबंधाने शंकराचार्य व रामानुजा चार्य या दोघांनाही ही गोष्ट मान्य आहे की, जर वेदांत मता मध्ये अनुमानमूलक दोष आहेत असे सिद्ध झालें तर ते मत अग्राह्य ठरेल. परंतु त्यांनी असे प्रतिपादन केले आहे की, वेदांत मत सर्वथैव निर्दोष आहे. आणि वेदांत मतच सर्वथैव निर्दोष, असे जे शंकराचार्य व रामानुजाचार्य यांनी विधान केलें आहे ते, श्रुतिग्रंथ ईश्वरप्रणीत असल्या मुळे त्या ग्रंथां मध्ये प्रतिपादित जें तत्त्वज्ञानविषयक मत तें निर्दोष असलेच पाहिजे, अशा केवळ अंध श्रद्धेने त्यांनी केले नाही; तर श्रुती मध्ये प्रति पादिलेल्या सिद्धांतां विरुद्ध तकच्या आधाराने जे आक्षेप घेतले जात असत, किंवा अद्याप पर्यंत घेतले जातात, त्य आक्षेपांचे तर्काच्याच योगाने निराकरण करून त्यांनी वरील बिधान केले आहे. उदाहरणार्थ, अनुमानवादी ह्मणताः-इदं अयुक्तं यत् प्रमाण-अन्तर–प्रसिद्ध-अर्थबाधनं श्रुतेः ॥ (शारीरकभाष्य, २।१।१३) ह्मणजे, * प्रत्यः क्षादि प्रमाणांच्या योगाने सिद्ध होणा-या ज्या गोष्टी त्यांच्या विरुद्ध विचार श्रुतीने प्रतिपादन करणें हें ठीक