Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०
वेदकालनिर्णय.

 सुषु॒वस॑ ऋ॒भव॒स्तद॑पृच्छ॒तागोटा॒ क इ॑दनो' अब्रुबुधत् ।  श्वान॑ ब॒स्तो बोधयि॒तार॑मब्रवीत्संवत्स॒ इद्या व्य॑ख्यत ||

 अर्थ:-" हे ऋभूहो तुह्मीं निजून उठल्यावर विचारिलत की हे अगोय आतां आह्मांला कोणी जागें केलें ? बस्त्यानें ( सूर्य - अगोह्य ) तो जागे करणारा श्वान होय असे सांगितलें व ह्मणाला, आज संवत्सर आटोपल्यावर त्यानं असें केलें. " ऋभू ह्मणजे सूर्याचे किरण असें यास्क व सायणाचार्य ह्मणतात. परंतु कित्येक दुसन्या गोष्टींवरून, कांहीं यूरोपीय पंडितांनीं सुचविल्या- प्रमाणें, त्यांचा अर्थ ऋतु असा वेणें बरें दिसतें. हे ऋभू ह्मणजे ऋतुदेवता वर्षभर काम करून नंतर अगोह्याच्या ह्मणजे सूर्याच्या घरी बारा दिवस पर्यन्त स्वस्थ झोंप घेत पडतात, अस वर्णन आहे. हे बारा दिवस. ह्मणजे चांद्रसौर वर्षांचा मेळ घालण्यासाठीं घरलेले अधिक दिवस होत. यांचा कोणत्याच वर्षीत अन्तर्भाव होत नसल्यामुळे ऋतूंनी आपले काम बंद करून त्या दिवसांत स्वस्थ झोंप घेतली ह्मणणे अगदीं योग्यच आहे. आतां प्रश्न एव- ढाच की हा ऋतूंना जागे करणारा कुत्रा कोण ? वरील विवेचना- वरून तो कुत्रा ह्मणजे मृगपुंजाजवळचा श्वानपुंजच असला पाहिजे हें उघड आहे. ह्मणजे अर्थातच या तारकापुंजाशीं सूर्य आला ह्मणजे वसंत ऋतूस, व नव्या वर्षास सुरुवात होऊन ऋतु- देवता जाग्या होऊन आपले काम चालू करीत. ह्मणजे वंसतसंपात त्यावेळी श्वानपुंजाजवळ होता. श्वानपुंजाजवळ वसंतसंपात असला