संबंधानें वेदांत कांहीं उल्लेख नाहींत. परंतु वेदकाळीं जर वसंत-
संपांत मृगशीर्षात होता तर तो कृतिकांत असल्याचे दाखले वेदां-
मध्ये मिळणार कसे ? परंतु या गोष्टींकडे लक्ष न देतां आजपर्यन्त
विद्वान् लोकांनीं भलत्याच गोष्टीवर काथ्याकूट केली आहे. परंतु
जर त्यांनीं वैदिक सूक्तांचें योग्य तऱ्हेनें परीक्षण केलें असतें, तर
त्यांना ही गोष्ट सहज कळून आली असती. मग 'संवत्सराच्या
शेवटीं श्वान ऋभूंना जागे करीत ' या वैदिक ऋचेचा खरा अर्थ
कळण्यास त्यांना अडचण पडली नसती. यमाच्या कुत्र्याचें स्थान
व वृत्राच्या वधाची जागा यांच्या ऋग्वेदांतील वर्णनावरून व 'वृक
उर्फ श्वानपुंज देवयानाच्या टोंकाला असलेला अपार समुद्र उलटून
आल्यावर सूर्याच्या पूर्वी उगवूं लागतो ' या वर्णनावरून त्या का
ळची संपाताची जागा स्पष्ट दिसून येते.
कित्येकांचें असें ह्मणणें आहे कीं, वैदिक ऋषींना आकाशस्थ
गोलांच्या सामान्य गतींविषयींही माहिती होती असें दिसत नाहीं.
परंतु हें मत फार संदिग्ध आहे. हल्लींच्याप्रमाणे निरनिराळी
वेधयंत्रे त्यावेळीं नव्हतीं व म्हणून तेव्हांचे वेध आतांच्या इतके
सूक्ष्म नव्हते असा जर वरील ह्मणण्याचा अर्थ असेल, तर ते
अक्षरशः ख़र आहे. परंतु वैदिक ऋषींना सूर्य व उषा याखेरीज
दुसरें कांहीं माहीत नव्हतें; नक्षत्रें, मास, अयनें, वर्ष वगैरे गोष्टं
त्यांना अगदीं अपरिचित होत्या, असा जर त्याचा अर्थ असेल
तर मात्र या ह्मणण्याला ऋग्वेदांत मुळींच आधार नाहीं. अर्जुनी
पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/९१
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४
वेदकालनिर्णय.