Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७३

वेदकालनिर्णय.

लोप शब्दाच्यामध्ये झाल्याचें उदाहरण नाहीं. इतर भाषांच्या संबं धांत अशी उदाहरणें पुष्कळ आहेत. व तो नियम ग्रीक व संस्कृत यांच्या संबंधालाही लाविल्यास आग्रयण शब्दापासून (ओर्इऑन्) ओरायन शब्दाची सिद्धि करता येईल. परंतु ओरायनचें मूळ जरी आपल्याला नक्की समजलें नाहीं तरी निरनिराळ्या आर्य राष्ट्रांतील •दंतकथांमधील परस्पर सादृश्यावरून त्याचें मूळस्वरूप कांहीं तरी प्राचीन आर्य शब्दच असला पाहिजे यांत संशय नाहीं. व हें मूळ जरी नक्की समजलें नाहीं तरी वरील एकंदर विवेचनास कोणताही बाध येत नाहीं. या उपपत्तीची बहुतेक भिस्त वैदिक ग्रंथांतील वाक्यां- वरच आहे, व त्यांचें एकंदर धोरण वसंतसंपात एकदां मृगशी- र्षीत होता हें दाखविण्याचें आहे, असें आपण पाहिलेंच आहे. या उप- पत्तीला पारशी व ग्रीक दंतकथांवरून चांगली बळकटी येते. तसेंच जर्मन लोकांतील दंतकथांचाही या उपपत्तीवरून चांगला उमज पडतो. पुष्कळ वैदिक गोष्टींचा या उपपत्तीप्रमाणे समाधान कारक अर्थ लागतो हें पूर्वी दाखविलेंच आहे. अशी जी ही उप- पत्ति इतक्या गोष्टींचा, इतक्या आख्यायिकांचा, इतक्या दंतकथांचा समाधानकारक उलगडा करते, ती खरी मानावयास कोणती हरकत आहे? परंतु या उपपत्तीला प्रत्यक्ष प्रमाण ह्मणून वेदवचनेंही दाख- वितां येतील; व तीं दाखविल्यावर या गोष्टीसंबंधाने शंकेला जा- गाच रहाणार नाहीं. असो.
 वेदांग ज्योतिपांतील कृतिकांच्या स्थितीवरून काढलेल्या अनु- मानांस मॅक्समुलरने नांवें ठेविली आहेत. कां तर त्या स्थिती