एक वस्त्राचा तुकडा परिधान करावयाचा असतो. या चालीचेंही
"मूळ वर सांगितलेल्या गोष्टींतच आहे असे दिसतें.
परिधान करावयाच्या तीन जानव्यांपैकी एक उत्तरीय वस्त्राच्या
ऐवजी आहे, असें देवलाने म्हटले आहे. यावरून जुनी मूळची
रीत काय होती हैं स्पष्टच दिसतें. तात्पर्य पहावयाचें एवढेंच कीं,
यज्ञोपवीताचा मूळचा अर्थ लहानसें अरुंद वस्त्र असा असून होतां
होतां स्मृतिकाळीं त्याचा सूत्र अथवा जानवें असा अर्थ झाला.
आतां हें वस्त्र अथवा सूत्र परिधान करण्याची आपली व पारशांची
सध्यांची पद्धति निराळी आहे. पारशी लोक आपल्या प्रजापती-
प्रमाणेंच ह्मणजे कमरेभोंवतीं तें गुंडाळतात; व आपण उजव्या
खांकेखालून व डाव्या खांद्यावरून घालतों. पण ही आपली पद्धत
मागाहून आली असें दिसतें. कारण तैत्तिरीय संहितेमध्यें नेहमींची
जानव्याची स्थिति ह्मणजे निवीत अशी दिली आहे. हल्लीं निवीत
ह्मणजे दोन्ही हात मोकळे ठेऊन गळ्यांत सरळ माळेप्रमाणें अस-
लेली जानव्याची जागा. परंतु कुमारिल भट्टानें आपल्या तंत्रवार्ति-
कामध्यें निवीत* ह्मणजे कमरेभोंवतीं गुंडाळणें असाही अर्थ दिला
आहे. आनंदगिरि व गोविन्दानन्द यांनींही शांकरभाष्यावरील
आपल्या टीकेमध्यें असाच अर्थ दिला आहे. यावरून ब्राह्मणही
पूर्वी आपले उपवीत पारशी लोकांप्रमाणेच कमरेभोंवतीं बांधीत
↑ तृतीयमुत्तरीयार्थं वस्त्राभावे तदिष्यते ।
* निवत केचिद्गलवेणिकाबधं स्मरन्ति । केचित्पुनः परिकरबंधं ।
पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/८६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वेदकालनिर्णय.