होत असे त्या काळाचें स्मरण राहिले आहे. पूर्वी दाखविल्या-
प्रमाणे पारशी लोकांच्या प्राचीन पंचांगावरूनही ह्याच काळाचें
अनुमान होतें. 'ह्मणजे पारशी, ग्रीक, जर्मन व भारतीय हे चार
आर्य लोकांचे वर्ग, या कथा उत्पन्न झाल्यावर व आग्रयण ऊर्फ
ओरायन याचें स्वरूप ठरून गेल्यावर एकमेकांपासून विभक्त झाले
असे दिसतें. ही गोष्ट सिद्ध करण्यास आणखी पुराव्याची गरज
आहेसे वाटत नाहीं. तरी आणखी एका चमत्कारिक गोष्टींतही या
राष्ट्रांमध्ये विशेष साम्य दिसून येतें. ती जरा मजेदार व मह
त्वाची असल्यामुळे तीविषयीं थोडा विचार करूं.
ग्रीक पुराणांमध्ये, ओरायन हा आपल्या वधानंतर नक्षत्ररू-
पानें आकाशांत राहिला; व तेथें तो, पट्टा, तरवार, सिंहचर्म व
गढ़ा हीं धारण करणाऱ्या राक्षसाच्या रूपानें दिसत आहे, असें
वर्णन आहे. आतां ओरायनची उत्पत्ति जर वर सांगितलेल्या
आर्य राष्ट्रांची फुटाफूट होण्याच्या पूर्वीची असेल, तर या ओरा-
यनच्या उपकरणांविषयींही त्या सर्वोच्या ग्रंथामध्ये कांहीं तरी
उल्लेख आढळले पाहिजेत. जरा सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास ते तसे
आहेत असे आढळून येईल. वेदांमध्ये मृगशीर्षाची देवता सोम
आहे. सोम ह्मणजे पारशी लोकांचा हओम. अवेस्त्यांतील या
हओमाच्या सूक्तांत एक श्लोक आहे. त्यांत “ हे हओमा तुला
मझ्दानें ( ईश्वरानें ) ताराखचित अशी एक मेखला दिली आहे, "
अर्से हटले आहे. पण मूळामध्ये ऐव्यओघनेम् असा जो शब्द
आहे त्याची मेखला शब्दावरून चांगली कल्पना होणार नाहीं.