Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४
वेदकालनिर्णय.

त्याला बाण मारितो अशाविषयीं बऱ्याच कथा आहेत. जर्मन कथांमध्ये हा व्हरिण ह्मणजे सूर्य देवतेचा प्राणी आहे. ह्म- ही सर्व गोष्ट वेदांतील रुद्रानें ऋष्यरूपी प्रजापतीला मारण्याच्या गोष्टी सारखीच आहे. तसेंच जर्मनीतील व इंग्लंडांतील मध्ययुगीय तपश्चरणनियमांच्या ग्रंथांत असे वर्णन आहे कीं, जुन्या वर्षाचा शेवट व नव्याचा आरंभ यांच्या मधल्या डाएझ्वे|ल्फटन म्हणजे वैदिक द्वादशाह, या नावाच्या काळांत त्या काळचे लोक एक खेळ करीत असत; त्यांत दोन माणसें मुख्य काम करणारी असत, एक हरिणाचें सोंग घेतलेला व दुसरा हरिणीचें सोंग घेतलेला. हे बारा दिवस सर्व वर्षीत फार पवित्र असल्यामुळे व त्या वेळीं देव मनुष्यांची घरें पाहण्यासाठी पृथ्वीवर उतरतात अशी कल्पना असल्यामुळे वर सांगितलेला खेळ त्या देवांचेच कांही तरी चरित्र दाखवीत असावा असे समजण्यास अ- गदर्दी हरकत नाहीं. एकंदरीत भारतीय व जर्मन लोकांच्या जुन्या दंतकथांमध्ये फारच साम्य आहे, असें यावरून उघड दिसतें. "
 या वर्णनांत आलेला जो हरिणाचा खेळ तो जुनें वर्ष व नवें वर्ष यांच्या मधल्या बारा दिवसांत होत असे. त्या दिवसांना + श्वानाचे दिवस अशा अर्थाचें नांव आहे. या दिवसांचा हरिण व व्याध यांशीं कांहीं तरी संबंध दिसून येतो. मार्गे सांगितलेच आहे की आपलेकडे प्रथम चांद्र व सौर वर्षीचा मेळ बसविण्यासाठी दर

  • Mediaeval Penitentials.

+ Dog days