डल्यामुळे आर्टेमिस हिनें त्यास आर्टिजिया येथे बाणाने ठार
मारिलें." दुसरे ह्मणतात, "आर्टेमिसची त्यावर प्रीति बसली. परंतु
तिचा भाऊ जो अपालो त्यास हें न खपल्यामुळे तो समुद्रांतील
दूरची एक वस्तु तिला दाखवून ह्मणाला, 'तुला ही वस्तु बाणानें
छेदितां येणार नाही.' त्यावर तिनें लगेच बाणाचा नेम धरून
त्याचें छेदन केलें. परंतु पुढे ती वस्तु ह्मणजे समुद्रांत पोहत
असेलल्या ओरायनचेंच शिर होतें असें आढळून आलें." आणखी
कांहीं असें ह्मणतात की, "ओरायननें आर्टेमिसचा अयोग्य रीतीनें
अभिलाप केल्यावरून तिनें त्याला एका बाणानें ठार मारिलें. "
या सगळ्या गोष्टींत अभिलाष, वाण, व शीर्षच्छेदन या वैदिक-
ग्रंथांतील सर्व बाबी आढळून येतात. हें नक्षत्र सूर्योदयीं मावळू
लागणें हें वादळांच्या बगैरे. ह्मणजे वर्षाकाळाच्या आगमनाचें
लक्षण असें ग्रीक लोकांत मानीत; व त्या अन्वयें या नक्षत्राला
इंबिफर अथवा ॲकोसस ह्मणजे वर्षाकाळाला आणणारे अशा
अर्थाची नावें त्यांनी दिलीं होतीं. ह्मणजे वेदांत जसें व या तारकेला
वर्षारंभ करणारी व तिलाच गुनाशिरौ या नांवानें पर्जन्यागमन-
सूचक असे ह्मटले आहे, तसेंच हे ग्रीक लोकांचें समजावयाचें.
पण जर्मन लोकांतल्या दंतकथा तर याहूनही स्पष्ट आहेत
•प्रो० कुहन म्हणतो -- आमच्या प्राचीन व अर्वाचीन अशा दोन्ही
दंतकथांमध्ये एक व्याध आहे. त्याला पूर्वी वोडन ऊर्फ गोडने
या नावानें मुख्य देव मानीत असत. हा एका हरिणामार्गे लागून
पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/८०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वेदकालनिर्णय.