Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

3 ठेपतों. मृगांत वसंतसंपात होता है दाखविण्यास फल्गुनीपूर्ण- मासी उदगयनाबरोबर वर्षारंभ होत असे असे मानून जो एक अप्रत्यक्ष आधार म्हणून घेतला आहे त्यासंबंधाचा दीक्षितांचा मत- भेद वर सांगितलाच आहे. याच्या दुसऱ्या एका आधारासंबंधानेंही मतभेद आहे. आग्रहायणासंबंधानें विचार करतांना मार्गशीर्षा- मध्यें एकदां वर्षारंभ होता अशी प्राचीन ज्योतिर्विदांची कल्पना आग्रहायणी शब्दाच्या चुकीच्या व्युत्पत्तीवर झाली, कारण त्याच्या प्रसिद्ध अर्थाप्रमाणें [ वर्षाची पहिली रात्र ] पाहिल्यास आग्रहा- यणिकाची म्हणजे मार्गशीर्षाची पौर्णिमा ही वर्षारंभाची रात्र असली पाहिजे असें होतें; परंतु वर्षारंभ वसंतारंभीं धरा अथवा उदगयनीं धरा, कसेंही केले तरी त्यावरून विलक्षण प्रकारचीं अनुमानें निघ- तात म्हणून सदर अर्थ चुकीचा आहे व म्हणून मार्गशीर्ष हा महिना वर्षारंभाचा होता असे मानतां येत नाहीं — असें लो. टिळकांनी प्रतिपादन केले आहे. यावर दीक्षित म्हणतात " " मार्गशीर्ष छा

वर्षांरंभाचा पहिला मास असे प्रत्यक्ष दाखले आहत; तर ती गोष्ट नाकवूल करतां येत नाहीं. " त्यांच्या मतें मृगशीर्षयुक्त पौर्णि- मेच्या दुस-या दिवशीं वर्ष सुरू होणें असंभवनीय नाहीं आणि त्या- प्रमाणे होत असे. परंतु हें दीक्षितांचें म्हणणे बरोबर दिसत नाहीं. कारण, ज्या काळासंबंधानें हा वाद चालला आहे त्याकाळी, वसंतसंपातांत सूर्य असतांना वर्षारंभ होत असे; व हें ह्मणणें दीक्षि-

  • भा. ज्यो. पान १३३-१३४.