Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेदकालनिर्णय, 4 नव्हती. आरंभी हू लावणे किंवा असल्यास काढणें या तत्वावर बऱ्याच संस्कृत शब्दांची सहज व्युत्पत्ति सांगता येईल. मृगाच्या डोक्यांतील तीन तारांना इन्वका किंवा हिन्वका हे शब्द आहेत. पण संस्कृत व्याकरणकार ते दोन निरनिराळ्या इन्व्व हिन्व् या धातूंवरून साधितात. पण त्यांनीं, इन्व, हिन्दू; अय्, हय्; अट्, हट्; अन्, हन्; अशा प्रकारची दुहेरी रूपें कां असावीं याचे कारण कधींही दिलेले नाहीं. त्याचें ह्मणणें अयन शब्द अय् = जाणं यापासून निघाला, हयन् हय् = जाणें यापासून व हायन हा= जाणे यापासून निघाला. परंतु अशा रीतीने सगळ्या शब्दांची व्यव स्था न लावतां आल्यामुळे त्यांना पुष्कळदां ऋपृषोदरादि गणाचा आश्रय करावा लागला आहे. परंतु तें कसेही असले तरी इतके खरें कीं, अयन व हायन या दोहोंचाही धात्वर्थ गमन असा आहे; व जेव्हां त्या दोहोंचाही कालभाग दाखविण्याकडे उपयोग होऊ लागला तेव्हां त्यांना विशिष्ट अर्थही मिळाला. ह्मणजे अयन हा शब्द अर्धवर्षवाची झाला व हायन पूर्णवर्षवाचक झाला. आतां पहिल्या अयनाचा आरंभ तोच वर्षाचाही आरंभ. म्हणून अय- नारंभवाचक आग्रयण शब्दाचा संवत्सरारंभवाचक आग्रहायण असा स्वरूपभेद झाला.

  • पृषोदर शब्द पृषत् व उदर यांपासून झालेला आहे. यामध्ये त् चा

लोप व्हावयास कांहीं नियम नसल्यामुळे हा शब्द अनियमितपणें साधणा-या सर्व शब्दांचा प्रतिनिधि झाला आहे. पृपोदरादि गण म्हणजे अनियमितपण साधणाऱ्या शब्दांचा वर्ग.