Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ वेदकालनिर्णय. ब्दांशीं संबंध लाविल्यास या दोन्ही अर्थाची कारणे समजतात. एकंदर वर्षाचे अयनात्मक दोन विभाग हे फार प्राचीन आहेत. देवयान व पितृयान या रूपांनीं हे भाग पूर्वी होते याविषयीं मागें विवेचन आलेंच आहे. या अयनं शब्दाला हू लाविल्यास त्या- पासून हायन शब्द सहज होईल. अशा प्रकारें आरंभी स्वर असलेल्या शब्दांना ह् लावण्याची रीत अजूनही आपल्याला आढळते. उदाहरणार्थ, इंग्रजी हिस्टरी ( इतिहास ) हा शब्द इस्तरी यावरून निघाला आहे, असें मॅक्समुल्लरने आपल्या भाषा- शास्त्र नांवाच्या ग्रंथांत दाखविले आहे. यासाठीं अयन शब्दा- वरून हयन व त्यावरून पुढे हायन शब्द साधिल्यास त्यांत विल- क्षण असें कांहीं नाहीं. आतां एकाच शब्दाचीं दोन रूपें अस- ल्यास सहजच त्यांचा एका एका विशिष्ट कार्याकडे उपयोग हो- ऊन त्यांमध्यं अर्थभिन्नत्वं येतं. अशा शब्दांनां संस्कृत कोश- कार योगरूढ असें ह्मणतात. ह्मणजे या शब्दांमध्ये धात्वर्थ व रूढी या दोहोंचा थोडथोडा भाग असतो. त्याप्रमाणे अयन याचा पूर्वीचा अर्धवर्ष हा अर्थ कायम राहून हायन हा शब्द संबंध वर्षाचा वाचक होऊन बसला असावा. आतां अयनाचें हयन झाल्यावर आग्रयण ह्मणजे अग्र+अयन हा अग्र+हयन किंवा अग्रहण असा सहजच झाला; व हयनाचं पाणिनीच्या प्रज्ञादि गणाच्या अन्वयें हायन झाल्यावर अग्रहयणाचें अग्रहायण असें रूप झालें. परंतु सध्यांच्या व्युत्पत्तिशास्त्राच्या नियमाप्रमाणें ही रीत जरी इतकी साधी दिसते तरी आपल्या वैयाकरणांनीं ती मान्य केली