वेदकालनिर्णय. ५५ भारतामध्यें "रुद्रानें यज्ञाचे हृदय बाणाने विद्ध केलें; नंतर तो विद्ध झालेला यज्ञ अग्नीसह मृग होऊन पळून गेला, व त्याच रूपानें आकाशांत जाऊन रुद्र पाठीस लागला आहे अशा रूपानें तो तेथे विराजमान होतो आहे," असे वर्णन आहे. या गोष्टीवरूनच रुद्राला यज्ञहा हें नांव मिळाले. तांड्य ब्राह्मणांतील ही प्रजापतीची गोष्ट जरा निराळी आहे. त्या ठिकाणी त्यानें आपण होऊनच स्वतःला बळी देण्यासाठी देवांच्या स्वाधीन केले असे वर्णन आहे. परंतु हें कसेंही असले तरी, रुद्रानें यज्ञाला ऊर्फ प्रजापतीला संवत्स- रारंभी मारिलें ही गोष्ट खरी. याकाळासंबंधाने दुसरीही एक सूचक गोष्ट आहे. शूलगव यज्ञ वसंत अथवा शरदऋतूंमध्यें आर्द्रानिक्षत्री करावा असे आश्वलायन गृह्यसूत्रांत सांगितले आहे. हल्लीं या बाक्याचा अर्थ, ज्या दिवशीं चंद्र आहोत असेल त्या दिवशीं- मग तो दिवस कोणताही असो या यज्ञाला आरंभ करावा, असा घेतात. पण, त्याचा मूळचा अर्थ वसंतामध्ये अथवा शरदऋतूमध्ये आर्द्रानक्षत्रीं पूर्णमास किंवा दर्श असतांनां या यज्ञाला आरंभ करावा, असा असावास वाटतें. असा अर्थ घेतल्यास हा यज्ञ उत्पन्न झाला त्यावेळीं वसंतसंपात आर्द्रा- नक्षत्राजवळ होता असे होतें. संपात कांहीं काळाने मागें आल्यावर पूर्णमास किंवा दर्श हे आर्द्रानिक्षत्रीं वसंतांत किंवा शरदांत होत नाहीसे झाल्यावर या यज्ञाचा आरंभदिवस पूर्णमास किंवा दर्श -
- तां. न्ना. ७–२–१. आणखी तै. आ. ३-९-२२-१.
$ आ. गृ. सू. ४-९-२.