भो , प्रीमंत पो. नं. पं. वाचनालय, कृत्तिकांमध्यें वसंतसंपात होता याला दीक्षितांनी एक प्रत्यक्ष आधार दाखविला आहे. शतपथ * ब्राह्मणामध्यें " कृत्तिका पुष्कळ आहेत व जो त्यांवर अग्न्याधान करतो तो पुष्कळपणा मिळवतो. ह्मणून कृत्तिकांवर आधान करावें. या मात्र पूर्वदिशे- पासून चळत नाहींत. इतर सर्व नक्षत्रें पूर्वदिशेपासून चळतात " अशा अर्थाचीं वाक्ये आहेत. यांत ' पूर्वेपासून चळत नाहींत, असें ह्मटलें आहे; यावरून त्या नेहमीं पूर्वेस उगवतात, ह्मणजे त्या विषुववृत्तावर आहेत असे सिद्ध होतें. विषुववृत्तावरचा व क्रान्तिवृत्ता- वरचा समान भाग ह्मणजे या ठिकाणीं वसंतसंपातबिंदुच होय. यामध्ये थेट पूर्व कोणती हैं समजण्यांत जरी एखाद्या अंशाची चूक झाली तरी त्यायोगानें सुमारें २०० वर्षांहून अधिक चूक पडणार नाहीं. या प्रत्यक्ष आधारामुळे कृत्तिकादिगणनेवरील सर्व आक्षेप दूर होतात, इतकेंच नव्हे तर इतर कमी दर्जाच्या आधारांना फारच बळकटी येते. d कृत्तिकांच्या पुढे जातां जातां रोहिणीमध्ये एकदां वसंतसंपात होता असे दाखवावयास प्रजापति व रोहिणी यांच्या गोष्टीवरून थोडासा आधार मिळतो हें पुढें आलेंच आहे. त्याच्यापुढे गेलें ह्मणजे मृगांत ज्यावेळीं संपात होता त्या काळाशीं येऊन आपण $ भा. ज्यो. पान १२७.
- २-१-२-एता हवै प्राच्यै दिशो नच्यवन्ते सर्वाणि ह वा अन्यानि
नक्षत्राणि प्राच्यै दिशश्चवन्ते ।