Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेदकाल निर्णय. मारिलें आहे. या “ परावती" चा अर्थ यमलोक असा दिसतो. पण ऋग्वेदांत दहाव्या मंडळांत एके ठिकाणीं, इन्द्रानें नमुचीलां मारून देवलोकाचे मार्ग मोकळे केले, असे वर्णन आहे. त्यावरून नमुचीला मारण्याचें नक्की ठिकाण देवयानाचें द्वार हे होय. वाज- सनेयी संहितेमध्यें (१०-१४) एका याज्ञिक विधीच्या वर्णनांत नमुचीच्या वधाचा काल व स्थान हीं दिलीं आहेत. त्यांत ऋत्विज् यजमानाला पूर्त्रादि सर्व दिशांमधून व वसंतादि सर्व ऋतूंमधून ( वसंतापासून शिशिरापर्यंत ) नेल्यावर व्याघ्रचर्माखाली झांकलेला एक धातूचा तुकडा दूर फेंकून देऊन म्हणतो कीं, " नमुचीचें शीर्ष फेंकून दिले. " या शब्दांचा जर कांहीं अर्थ होत असेल तर तो हाच कीं, ऋतूंसंबंधानें पाहिल्यास शिशिराच्या शेवटीं किंवा ऋग्वेदांत वर्णन केलेल्या पितृय़ानाच्या द्वाराशीं वृत्राचा वध झाला. आतां यावरून नमुचि किंवा वृत्र, म्हणजे ग्रीक लोकांचा आर्द्रास हा यमलोकाच्या द्वाराशीं कसा आला हें समजेल. ८८ या नमुचीच्या मरणाविषयीं तांड्य* ब्राह्मणामध्ये एक चमत्का- रिक गोष्टS दिली आहे. इन्द्र व नमुचि यांमध्ये असें ठरलें होतें कीं, इन्द्राने नमुचीला रात्री मारूं नये, दिवसा मारूं नये, तसेंच $ ऋ. १०–७३-७. त्वं ज॑घंथ॒ नम॒चं मव॒स्युं दासः॑ कृण्वान ऋपये विमायं । त्वं च॑कर्य॒ मनवे स्योनान्प॒थो दे॑व॒त्रज॑सेव॒ याना॑न् ॥

  • तां. व्रा. १२-६-८

१ या ब्राहाणांतील गोष्टीवरूनच पुढे पुराणांत हिरण्यकशिपूची व नरसिंह अवताराची गोष्ट आली असावी.