वेदकालनिर्णय. आहेत हे उघड आहे. ह्मणजे मृगशीर्षाची आकृतिही, ओरायनचा पट्टा, त्याचे मागचे दोन पाय व पुढला डावा पाय मिळून कल्पिली पाहिजे. या आकृतीप्रमाणें अमरानें दिलेली इन्वकांची जागाही साधते. या आकृतींत इन्वका ह्मणजे बाण अथवा ओरायनाच्या पट्यांतील तीन तारा होत. या पुंजामध्यें दुसन्याही कित्येक आकृ- तींची कल्पना केली असेल. सर्व मृग शरीर, व यज्ञोपवीत धा- रण करणारा प्रजापति या आकृतींची ही कल्पना केलेली आहे. परंतु या सर्व कल्पनांत शीर्षाची कल्पना सर्वात जुनी दिसते. व ती वरूनच वाढत वाढत दुसन्या कल्पना निघाल्या असे वाटतें. या विवेचनांत मृगशीर्ष नक्षत्र ओरायन पुंजांतच आहे असे आपण मानले आहे. व जरी याबद्दल कित्येक पंडितांनी शंका घेतली आहे तरी यांत असंभवनीय असें कांहींच नाहीं. कारण रमणीय अशा रोहिणी मागून लगेच येणारा दुर्वृत्त प्रजापति रु द्राच्या त्रिकांड बाणानें विद्ध होऊन पडलेला, व तो बाण त्याच्या शिरामध्ये अडकून राहिलेला अद्याप दिसतो आहे. या गोष्टीवरून तारकापुंजा संबंधानें तर शंका रहाणें संभवतच नाहीं. " याप्रमाणे मृगशीर्षाची आकृति प्रथमतः कशी कल्पिली होती हैं पाहिल्यावर दुसऱ्या तारा निश्चित करणे कठीण नाहीं. रोहिणी संबंधानें शंका नाहींच. रुद्र आर्द्रा नक्षत्राची देवता असल्यामुळे त्याचें स्थान अर्थात् आर्द्रा ह्मणजे ओरायनचा उजवा स्कंध हें होय. परंतु ऐतरेय ब्राह्मणामध्ये ज्याला हल्ली आपण
पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/६१
Appearance