Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेदकालनिर्णय. प्रत्येक बाबतीत आपल्या अगदी उलट मत स्वीकारीलें आहे. व ह्मणून आपला वर्षारंभ उत्तरायणीं झाला तर त्यांचा त्याच्या उलट ह्मणजे दक्षिणायनीं व्हावयाचा व असेंच खरोखर आहे. पारशी च हिंदु यांच्या जुन्या पंचागाचा मेळ इतकाच आहे असें नाहीं. वर सांगितलेंच आहे कीं, दोघांचेही पितृपक्ष भाद्रपदांत एकाचवेळीं येतात. पारशी लोकांचा पहिला महिना प्रवशिनम् ह्मणजे पितृमास हा आहे, व त्याचा आरंभ दक्षिणायनापासून होतो. या महिन्या- पासून चवथा महिना तिष्ट्येहे, किंवा तिष्ट्याचा मास हा आहे व हें तिष्ट्यनक्षत्र ह्मणजे #सिरिअसचा तारा होय असे मानतात. आतां आपल्याकडे भाद्रपदापासून मोजलें असतां ४ था महिना मार्गशीर्ष ह्मणजे मृगशीर्षाचा मास हा येतो; व मृगशीर्ष व सिरिअसू हे अगदीं जवळच आहेत. तसेंच प्रवशिनम् महिन्यामध्यें दक्षिणायनीं वर्षारंभ धरिला ह्मणजे दथुषो महिन्याचा आरंभ बरोबर वसंतसंपात होतो. हा दधुषो महिना सृष्टिकर्त्या अहुरमझ्दाचा आहे. यावरून तो एकदां वर्षारंभाचा महिना असावा असे दिसतें. याप्रमाणे जुन्या अवस्तिक पंचांगामध्यें वसंतसंपात आरंभ होणाऱ्या वर्षाच्या कांहीं खुणा आपल्याला आढळतात. या गोष्टी व विशेषेकरून दोघांचे पितृपक्ष एक असणे हे केवळ काकतालीय असेल असें संभवत नाहीं. आतां, त्यांच्यांत वर्षांरंभ उत्तरायणांतून दक्षिणायनांत जरी गेला तरी पितृपक्षासारखी पूर्वापार चालत आलेली पवित्र गोष्ट स्थानभ्रष्ट करणें हें त्यांस योग्य वाटलें नाहीं. ह्मणून अजूनही दोघांचे पितृपक्ष एकच आहेत. 1.

  • व्याध.

/ He