Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

i वेदकालनिर्णय. हैं कारण समाधानकारक वाटत नाहीं. संदर्भावरून मार्गशीर्षाला वर्षारंभाचा महिना ह्मणण्याचा आशय स्पष्ट दिसतो. सूर्यपंडित नांवाच्या एका ज्योतिष्यानें आपल्या परमार्थप्रपा नांवाच्या गीते- वरील टीकेमध्यें झटलें आहे कीं, मार्गशीर्षाचें दुसरें नांव आग्रहायणिक असें आहे, व त्यांतील पौर्णिमा संवत्सराची पहिली रात्र असे. असा अर्थ घेतल्यास भगवद्गीतेंतील वरील वचन आग्रहायणिक शब्दाच्या चुकीच्या व्युप्तत्तीवर लिहिलें गेलें असावें असे दिसतें. परंतु या शब्दाची व्युप्तत्ति नीटपणे घेतल्यास त्यांत घोंटाळा होण्यासारखें कांहींच नाहीं. आग्रहायणिक हा साधित शब्द असल्यामुळे त्या नांवाचा महिना वर्षारंभाचा असणे शक्यच नाहीं. परंतु त्यावेळी अग्रहायण ह्मणजे मृगशीर्ष, हे पहिले नक्षत्र ही कल्पना अगदी नाहींशी होऊन मार्गशीर्ष महिनाच वर्षारंभाचा होता असें मानूं लागले; व या नव्या कल्पनेला एकदां गीतेमध्यें स्थान मिळाल्याबरोबर तिचा त्वरित सर्वत्र प्रसार होऊन विद्वानांनीही आपले मत तसें बनविलं. या चुकीच्या कल्पनेचा इतर विद्वानांनींच अवलंब केला असे नाही, तर ज्योतिषी लोकांनींही तसेच केलें. पण त्याचा परिणाम काय झाला पहा. जुन्या ज्योतिषग्रंथांमध्यें वर्षारंभ उत्तरायणीं होत असे. ह्मणजे वर्षाचा पहिला महिना तोच उत्तरायणाचाही पहिला § यद्वा मृगशिरः पूर्णिमासंबंधेन वर्षादिर भिहितरतस्मिन्नेवाग्रहायणीत्यभि 'धानात् । आग्रहायणं यस्यां साग्रहायणी । अत एव आग्रहायणिक इति मार्गशीर्ष नाम । अतोऽस्य मासस्य मुख्यत्वाद्विभूतिमत्वम् ।