वेदकालनिर्णय. ३३ J त्पत्तीसंबंधानें बराच मतभेद आहे. परंतु त्या सर्व मतांच्या मु- "ळाशीं मार्गशीर्ष पौर्णिमेला पूर्वी एकदां वर्षारंभ होत असे व त्या पौर्णिमेच्या नांवावरून मृगशीर्षाला आग्रहायणी हें नांव पडलें ही कल्पना साधारण आहे. जर ही कल्पना दूर केली तर या शब्दासंबंधानें सर्व अडचण नाहींशी होते. शिवाय ही कल्पना खरी मानावयास वेद किंवा पाणिनि यांमध्यें आधार नाहीं. पाणि- नीचें एकंदर धोरण अग्रहायण हें नक्षत्राचें नांव धरून त्यावरून आग्रहायणी हे पूर्णमासाचें नांव व त्यावरून आग्रहायणिक हें महि- न्याचें नांव साधण्याचें आहे. नक्षत्रवाचक अग्रहायण शब्द आतां नाहींसा झाला आहे व अमरसिंहानें आग्रहायणी असाच नक्षत्रवाचक शब्द दिला आहे. परंतु या जुन्या शब्दाच्या अर्थाचा विपर्यास करण्यांत अमरसिंह एकटाच वांटेकरी आहे असें नाहीं. मार्गशीर्ष पौर्णिमा ही संवत्सराची प्रथम रात्र होती, या कल्पनेवरून पुढील वाङ्मयामध्ये दुसन्याही पुष्कळ चुका उत्पन्न झाल्या आहेत. W आतां मार्गशीर्षी पौर्णिमेला वर्षारंभ होत असे असें धरल्यास काय काय निष्पन्न होतें ते पाहूं. असें मानण्यास प्रत्यक्ष आधार " मासानां मार्गशीर्षोऽस्मि ऋतूनां कुसुमाकरः " या ऋगीतावचना- खेरीज दुसरा कोणताही नाहीं. आनंदगिरीनें या गीतावचनावरील " शांकरभाष्याच्या टीकेमध्ये मार्गशीर्ष महिना समृद्धीचा असतो झणून त्याचे विभूतिमत्व वर्णिलें आहे असे मटले आहे. परंतु
- भ. गी. १०-३५.
"