वेदकालनिर्णय. आग्रहायणी याचा अर्थ वर्षारंभ करणारे असा आहे. परंतु त्या नक्षत्राला हें नांव मिळाले कसे ? हा प्रश्न आहे. कोश- कारांनी व्युत्पत्ति देतांना मार्गशीर्ष पौर्णिमा ही वर्षाची प्रथम रात्र असल्यामुळे तिला आग्रहायणी असें म्हणतात व आग्रहायणीमध्यें पूर्णचंद्र मार्गशीर्षीत होतो म्हणून त्या महिन्याला आग्रहायणिक असें नांव मिळालें असें सांगितले आहे. हें ठीक आहे. परंतु ते आणखी असे म्हणतात की, अमरकोशांत सांगितल्याप्रमाणें मार्ग- शीर्षाचेंच आग्रहायणी असें नांव आहे, कारण त्या नक्षत्री चंद्र असतांना पूर्वी वर्षारंभ होत असे. परंतु हे म्हणणे बरोबर दिसत नाहीं. कारण नक्षत्रावरून पूर्णमासाला नांव द्यावयाचें ही नेह- मीची रीत आहे. म्हणून आग्रहायणी संबंधानें मात्र पूर्णमासावरून नक्षत्राला नांव मिळतें असें म्हणणे बरोबर नाहीं. पाणिनीच्या मताप्रमाणेंही असल्या उलट्या पद्धतीला कांहीं आधार नाहीं. पाणि- नीनं आग्रहायणीपासून आग्रहायणिक असे महिन्याचें नांव दिले आहे. त्यावरून आग्रहायणी याचा अर्थ त्याच्या मत मृगशीर्ष- नक्षत्र असा नसून मार्गशीर्षी पौर्णिमा असा असावा असे दिसतें. कारण महिन्यांची नांवें पूर्णमासावरून साधावी असे त्याचें मत आहे. आतां आग्रहायणी हा पूर्णमासवाचक शब्द पाणिनीनें चैत्री वगैरे शब्दाप्रमाणें साधिला आहे की काय हें बरोबर समजत नाहीं. परंतु कार्तिकी वगैरे शब्दांच्या सादृश्यावरून पहातां, त्यानें अग्रहा- यण शब्दापासून आग्रहायणी शब्द साधिला असून, अग्रहायण हें मृगशीर्षाचें मूळचें नांव असावें, असे दिसतें. या शब्दाच्या व्यु- ३२
पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/४७
Appearance