Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेदकालनिर्णय. २९ 4. असो. तर याप्रमाणे तैत्तिरीयसंहिताकाळीं फाल्गुन हा वसं- तमास होता असें ह्मणण्यास कांहीं आधार नाहीं. यासाठीं सायणाचार्याचा तसा अर्थ याठिकाणीं तरी मान्य करता येत नाहीं. शिवाय हा अर्थ कित्येक ब्राह्मणें व सूत्रे यांत आलेल्या "फाल्गुनी* पौर्णिमा ही संवत्सराची प्रथम रात्र " अशा अर्थाच्या वचनांशीही विरुद्ध आहे. तैत्तिरीयब्राह्मणामध्ये " उत्तरा फाल्गुनी ही संव- त्सराची प्रथम रात्र, संवत्सराच्या आरंभी अग्न्याधान करणारा. पुष्कळ संपत्तिमान् होतो " असें ह्मटले आहे. तसेंच सूत्रकारानींही “ संवत्सरसत्रांचा आरंभ फाल्गुनी अथवा चैत्री पौर्णिमा या दिवशीं करावा " असे स्पष्ट सांगितले आहे. आता या सर्व वचनांचा जर कांहीं अर्थ होत असेल तर फाल्गुनी पौर्णिमा ही र्याची पहिली रात्र असें खरोखर एकेकाळीं मानीत असत हैं आपल्याला कबूल केल्याशिवाय गत्यंतर नाहीं. आतां वर सांगितल्याप्रमाणे " फाल्गुनी पौर्णिमा हें संवत्सराचें मुख होय " या तैत्तिरीयसंहितेंतील वाक्याचा सायणाचार्यानी दिलेला अर्थ तर ग्राह्य नाहीं. तर दुसरा अर्थ कोणता घ्यावयाचा ? फाल्गुनी पौर्णिमेला वसंतसंपाती वर्षारंभ होत असे अशी तुम कल्पनाच करतां येत नाहीं. कारण या रीतीनें वसंतसंपात सु एपा है संवत्सरस्य प्रथमा रात्रिर्यत्फाल्गुनी पौर्णमासी ।श ना ६-२, २. १८.

श्र + १-१. २. ८. † आ० श्री. सू. १-२. १४.३.