Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ वेदकालनिर्णय. चौदाव्या शतकांत वसंतारंभ आतांप्रमाणेच फाल्गुनांत होत असे. परंतु तेव्हां, तैत्तिरीयकालापेक्षां उद्गयनारंभ एक महिन्याहूनही थोडा अधिक मार्गे हटला होता, या गोष्टीची बरोबर कल्पना न आल्यामुळे सायणाचार्यांनी परस्परविरुद्ध दिसणाऱ्यावर सांगित लेल्या वर्षारंभांची, दुहेरी ऋतू कल्पून कशीतरी एकवाक्यता करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आतां संपातचलनामुळे वर्षारं- भांत बदल होत जातो हे आपल्याला समजल्यावर सायणाचार्यांची युक्ती अयुक्त ह्मणून सोडून दिली पाहिजे. सुश्रुताच्या वैद्यक थामध्यें " फाल्गुनश्चैत्री वसंतः ” असें " एके ठिकाणीं ह्मटले आहे. परंतु तो भाग त्यांत कोणी मागाहून घातलेला असावा असे दिसतें. कारण त्याच्या जरा पूर्वी माघादि मासचक्र व शिशिरादि ऋतुचक्र सांगून, माघ फाल्गुन शिशिर ऋतु, चैत्र वैशाख वसंतऋतु वगैरे सांगितलें आहे. यावरून “फाल्गुनश्चैत्रौ वसंतः " वगैरे वर्णनुढ कोणी तरी प्रक्षिप्त केले असले पाहिजे. सुश्रुत व चरक यांच्या ग्रंथाचें सार वर्णन करणान्या वाग्भटानें “ फाल्गुनश्चैत्रौ वसंतः " वगैरे वर्णनाचा कांहींएक संबंध न आणितां त्याच्यापूर्वी सांगितलेली माघादि मासांची व शिशिरादि ऋतूंची पद्धत दिली आहे. यावरून " फाल्गुनश्चैत्रौ वसंतः " वगैरे वणर्न वाग्भटाच्यावेळी सुश्रुताच्या ग्रंथांत नव्हतेंच, किंवा असले तरी त्यास तें सुश्रुताचें खास असावें असें वाटलें नाहीं हे उघड आहे.

  • सूत्रस्थान अध्याय ६