Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हें पुस्तक छापून काढण्याबद्दल विचारिलें व त्यांनीं तें मोट्या संतोषानें ताबडतोब कबूल केलें. असो. वर सांगितलेंच आहे कीं, प्रस्तुत पुस्तक मूळग्रंथाचे समग्र भाषान्तर नसून सारांशरूप मात्र आहे. तथापि, त्यांत कोणतीही महत्वाची गोष्ट गाळलेली नाहीं, व पूर्वापार संबंध तोडलेला नाहीं. मूळ पुस्तकाप्रमाणें जरी यांत भाग पाडलेले नाहींत तरी लिहितानां अनुक्रमानें भागशः लिहिल्यामुळे वाचतांनाही ते सहज कळण्या- सारखे आहेत. त्यांचें थोडक्यांत येथें दिग्दर्शन करतो. " - प्रथमतः [ पानें १--५ ] वेदकालनिर्णयाचें महत्व व त्याच्या निरनिराळ्या पंडितांनीं स्वीकारलेल्या निरनिराळ्या पद्धति सांगि- तल्या आहेत. पुढें [ पाने ६ - १६] वैदिककाळच्या पंचांगाचें थोडें वर्णन देऊन यज्ञयागाचे काळ व वर्षारंभ यांचें विवेचन केलें आहे. यानंतर [ पाने १६-२६ ] वसंतसंपात एकाकाळी कृत्ति- कांत होता असे दाखविणाऱ्या गोष्टी देऊन तो काळ ठरविला आहे. यापुढे [ पानें २६ - ४१ ] मृगशीर्षांत वसंतसंपात होता हे दाखविण्यासाठीं मृगशीर्ष नक्षत्राचें दुसरें नांव जें आग्रहायणी त्याच्या व्युत्पत्तीचा विचार करून ते एकदां पहिले नक्षत्र होत असे दाखविलें आहे; व त्यांतच आग्रहायणी शब्दाच्या चुकीच्या व्यु- त्पत्तीवर आणखी चुकीच्या गोष्टी कशा रचल्या गेल्या हें सांगून संपाताच्या आंदोलनाच्या कल्पनेचें एक शक्य कारण दिले आहे. त्याच्या पुढें [ पा. ४१–१७] मृगाच्या शीर्षाविषयींच्या वेढ, -