Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेदकालनिर्णय. धरून वेदागज्योतिषांतील अयनादिकांची स्थिति इ. स. पूर्वी १३०० वर्षांच्या सुमारास वर्तविली आहे. तैत्तिरीय संहिता, तैत्तिरीय ब्राह्मण व दुसरे कांहीं ग्रंथ यांत पुष्कळ ठिकाणी नक्षत्रचक्राचा आरंभ कृतिकांपासून केला आहे. तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये, * " कृत्तिकांमध्यें अग्न्याधान करावें, कारण कृत्तिका नक्षत्रांचें मुख होत " असे म्हटले आहे. याचा अर्थही कृत्तिकांपासून वर्षारंभ होत होता असा उघड दिसतो, कारण त्याच ब्राह्मणामध्ये " मुखं वा एददृतूनां यद्वसंतः " ह्मणजे वसंत हा ऋतूंचें मुख आहे किंवा वसंत हा वर्षातील पहिला ऋतु आहे असे म्हटले आहे. अर्थात् या दोन्ही वाक्यांचा एकाच तऱ्हेचा प्रयोग असल्यामुळे त्यांचा अर्थही एकाच पद्धतीनें केला पाहिजे. - याच तैत्तिरीय ब्राह्मणामध्ये + " नक्षत्रे हीं देवांची मंदिरे आहेत. त्यांत देवनक्षत्रांमध्ये कृत्तिका पहिलें व विशाखा शेवटचें व यम नक्षत्रांमध्ये अनुराधा पहिलें व अपभरणी शेवटचें" असे म्हटलें आहे. मार्ग एके ठिकाणीं सांगितलेल्या शतपथब्राह्मणांतील वच- नाच्या आधारावरून, या तैत्तिरयिब्राह्मणांतील वाक्याचा अर्थ लाविला पाहिजे; म्हणजे, त्यांत सांगितलेल्या दोन नक्षत्रविभागांचा देवयान व पितृयान यांशी संबंध आहे, ह्मणजे कृत्तिकांपासून विशाखांपर्यन्त देवनक्षत्रे, व त्यांत सूर्य आहे तोंपर्यन्त देवयान

  • १-१.२-१ व १-१-२-६.

+ १५-२-७.