Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सीमंत वेदकालनिर्णय, वाचनालय, मोर, कोणते उल्लेख आहेत त्यांचा विचार करूं. व प्रथम, तो कृत्तिका नक्षत्रांत होता असे सांगणान्या वाक्यांचा विचार करूं. वराहमिहिराच्या वेळीं वसंतसंपात रेवतीच्या चतुर्थ चरणीं होता हें सुप्रसिद्धच आहे. परंतु त्यानें आपल्या ग्रंथामध्ये दोन ठिकाणीं अयनान्ताच्या त्याच्या पूर्वीच्या ग्रंथांत वर्णिलेल्या स्थितिविषयीं स्पष्टपणें सांगितलें * आहे. तो म्हणतो 'सांप्रत अयन पुनर्वसूं- • पासून होतें; परंतु, पूर्वी आश्लेषां पासून होत असे. ' या वराह- मिहिराच्या म्हणण्यास, गर्गपराशरांच्याही वचनांचा आधार आहे. तसंच महाभारतामध्यें भीष्माचार्य शरपंजरी पडले असतां उदगय- नास आरंभ होईपर्यन्त मरावयाचे थांबले; व हा आरंभ माघशुक्लपक्षांत झाला असे वर्णन आहे. यावरून धनिष्ठा- रंभीं उद्गयन होऊन अर्थात् कृत्तिकांमध्ये वसंत संपात होत असे, हें उघड होतें. वेदांगज्योतिषांतही हीच स्थिति, दिली आहे. त्यांत + उत्तरायण धनिष्ठारंभीं, वसंत संपात भरणीच्या पुढे १० अंश दक्षिणायन आश्लेषाध, व शरत्संपात विशाखांजवळ, अशा अयन व संपात यांच्या जागा दिल्या आहेत. त्यांवरून ज्योतिषी लोकांनीं अयनचलनाची मध्यमगति वर्षास ५० विकला S

  • बृहत्संहिता ३ - १ व २

१ आकृति पहा. + वेदांग ज्योतिष ५. ..