Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
वेदकालनिर्णय

गणिताप्रमाणे केले असतील हें संभवत नाहीं. हे २७ भाग ढोबळ प्रमाणावर मुख्य मुख्य तारांच्या खुणांवरूनच केले असले पाहिजेत. ह्मणून जेव्हां सूर्य अमक्या नक्षत्रीं होता अशा प्रकारचे उल्लेख वैदिक ग्रंथामध्ये आढळतील त्यावेळीं त्यांचा अर्थ सूर्य त्या नांवाच्या तारकापुंजाजवळ होता अर्से समजावयाचें. आतां हैं उघडच आहे कीं, असल्या स्थूल वेधांमध्ये दोन तीन अंशापर्यन्त एखादे वेळीं चूक असेल. तरी ते वेदकालाइतक्या जुन्या कालाचा निर्णय करण्यामध्ये अगदी निरुपयोगी आहेत असें मात्र नाहीं. कारण सूर्याच्या क्रान्तिवृत्तांतील एखाद्या स्थितीमध्यें जरी पांच अंशांची चूक झाली तरी फक्त ३६० वर्षीचेंच अंतर आपल्या हिशोबांत चुकेल. एवढे अंतर ज्या ठिकाणी हजारांनी काळ मोजावयाचा त्या ठिकाणीं कांहींच नाही म्हटले तरी चालेल. असो. तर आपल्या पुढील विवेचनांत नक्षत्रे म्हणजे समविभागात्मक न समजतां, त्या त्या नांवाचे नक्षत्रपुंज समजावयाचे. आतां, जसा वसंतसंपात- बिन्दु बदलत जाईल, तसे अयनान्तबिन्दूही बदलतील. व म्हणून जेव्हां वैदिक ग्रंथांमध्ये वसंतसंपाताच्या बदललेल्या स्थितीविषयीं कांहीं उल्लेख आढळेल, तेव्हां त्याच्या अनुरोधानें होणान्या अयना- तांच्या फरकाबद्दलही उल्लेख माढळले पाहिजेत. व असे उल्लेख सांपडले म्हणजे आपल्या अनुमानांनां अधिक पुरावा मिळाल्या- सारखे होईल. तर आतां वसंतसंपाताच्या स्थितीविषयीं कोणते