Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेदकालानर्णय.

संक्रमणापासून धरूं लागले, तेव्हां पूर्वीचा वर्षारंभ अजिबात न टाकतां त्याचा यज्ञकर्मात उपयोग करीत असत व इतर व्यवहा- राला नवीन वर्षारंभ धरीत असत. आतां संपातचलनाच्या योगानें ऋतुचक्र जसे जसे मागें येऊं लागलें तसे तसे वैदिक ऋषींनी आपल्या पंचांगामध्येही फेरफार केले होते की काय हे पहावयाचे आहे. हल्लींची आपली पंचागें, वसंत संपात रेवतीच्या चतुर्थ चरणीं आहे असें धरून केलेली असतात; व जरी वसंत- संपात आतां रेवती पासून अठरा अंश मार्गे आला आहे, तरी सध्यां आपण नक्षत्रमालेला आरंभ अश्विनी पासूनच करतों. रेवती- मध्यें वसंतसंपात शा. श. ४९६ चे सुमारास होता, व तेव्हां- पासून सध्यांची पद्धति सुरु झाली, असे मानून वसंतसंपाताची जागा नक्षत्रचक्रामध्यें बदलत गेल्याबद्दल कांहीं पुरावा सांपडतो की काय हैं आतां पहावयाचें. वर एके ठिकाणी सांगितलेंच आहे कीं, वैदिक ऋर्षांचे आकाशसंबंधीं वेध नुसत्या डोळ्यांनीच घेतले असल्या- मुळे त्यांमध्ये गणिताची फारशी भानगड नाहींच. आपणही तशाच प्रकारच्या साध्या पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे. सूर्याच्या अगदी जवळ असलेल्या तारका नित्य पहाणें हेंच ज्यांचें त्याची गति नि- श्चित करण्याचे साधन, त्या वैदिकऋषींनीं क्रान्तिवृत्ताचे २७ भाग*

*


कांहीं सायनवादी लोक ही गोष्ट कबूल करीत नाहींत. अगदी प्राचीन-

काळी सुद्धां नक्षत्रें समविभागात्मक असून त्यांचा आरंभ वसंतसंपातापासून होता ह्मणजे त्या संपातापासून १३० - २०' इतक्या भागाला अश्विनी, त्यापुढें भरणी वगैरे नांव होती अर्से त्यांचे मत आहे. पण कै. शं. बा. दीक्षित यांनीं है झणणें खोडून नक्षत्रे तेव्हां तारात्मक होती असे दाखविले आहे.

   2