Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेदकालानर्णय. शतपथब्राह्मणामध्ये देवांचे ऋतु व पितरांचे ऋतु सांगितले आहेत त्यांत " वसंतो ग्रीष्मो वर्षा । ते देवा ॠतवः । शरद्धेमंतः शिशि- रस्ते पितरो... स यत्र उद्गावर्तते देवेषु तर्हि भवति देवांस्तर्ह्यभि- गोपायति-अथ यत्र दक्षिणावर्तते पितृषु तर्हि भवति पितृस्तह्णभिगोपा- यति” । असें ह्मटलें आहे. यावरून उत्तरायणाच्या अर्थाविषयीं अस लेत्या सर्व शंका नाहीशा होतील. जर वसंत, ग्रीष्म व वर्षा हे देव ऋतु आहेत व सूर्य जेव्हां उत्तरेकडे वळतो तेव्हां तो जर देवांमध्यें असतो, तर उघडच उत्तरायणाचा आरंभ वसंत संपातापासूनच झाला पाहिजे. मकरसंक्रमणापासून त्याचा आरंभ होतो हे ह्मणणे योग्य होणार नाहीं; कारण देवांचा पहिला ऋतु जो वसंत त्याला कोणत्याही ठिकाणी मकरसंक्रमापासून आरंभ होत नाही. यासाठी देवलोक, देवयान किंवा उत्तरायण याचा अर्थ वसंत संपातापासून शरत्संपा- तापर्यंत होणाऱ्या वसंत, ग्रीष्म, वर्षा, या ऋतूंच्या सहा महिन्यांचा काळ असाच घेतला पाहिजे. , ह्मणून याच्या उलट कांहीं पुरावा जोपर्यंत मिळाला नाहीं, तों- 'पर्यंत प्राचीन वैदिककाळी वर्षारंभ सूर्य वसंत संपाती असतानां होत असे असे मानावयास मुळींच हरकत नाहीं. व ज्या अर्थी याच वेळी सूर्य उत्तर गोलार्धीत जाई, त्या अर्थी त्याच्या उत्तरायणा- चाही तेव्हांच आरंभ होत असे. ह्मणजे उत्तरायण, वसंत ऋतु, संवत्सर व यज्ञ या सर्वांचा आरंभ सूर्य वसंत संपात असतांना होत असे. यानंतर सहा महिन्यांनीं शरत्संपातीं विषुव दिन येत असे § शतपथ ब्राह्मण २-१ ३. "