Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ वेदका निर्णय. · सत्रांला जरी लागूं नसले, तरी निदान वर्षाला लागू असलेच पाहिजे; झणजे अर्थात् विश्र्वान् हें नांव सार्थ होण्यास वर्षारंभ संपाती झाला पाहिजे. आतां उत्तरायण या शब्दाचेही दोन अर्थ होऊं शकतात. एक* वर सांगितलेला ह्मणजे मकरपासून कर्क संक्रमणापर्य- तचा काळ, व दुसरा ह्मणजे वसंत संपातापासून तो शारद संपातपर्यन्तचा काळ. पहिल्या अर्थाप्रमाणे सूर्य उत्तरेकडे वळला कीं उत्तरायण सुरु होतें, व दुसन्या अर्थाप्रमाणें उत्तर गोलार्धात सूर्य जाऊं लागला ह्मणजे उत्तरायण होतं. पहिल्या अर्थाप्रमाणें वर्षारंभ मकरसंक्रमणीं व दुसन्या अर्थाप्रमाणें तो वसंतसंपाती धरला पाहिजे; परंतु वार्षिक सत्रांतील मधल्या दिवसाला विष्वान् दिवस ह्मणणें तसंच वसंतांला ऋतूचें मुख ह्मणणें व आग्रयणेष्टि अथवा अर्धवार्षिक यज्ञ दर वसंत व शरद् या ऋतूंमध्यें करावे लागणे, - या गोष्टींचा विचार करतां वर दिलेल्या दोन अर्थीपैकी दुसराच .विशेष ग्राह्य दिसतो व तोच खरा जुना अर्थ होय, असें दिसतं.

  • सूर्याचें क्षितिजावरचं उदयस्थान नेहमीं एक नसतें, हें सर्वास माहीत

आहेच. वसंतऋतूला ज्या दिवशी आरंभ होतो, त्या दिवशीं सूर्य बरोबर पूर्वेस उगवतो. त्यानंतर थोडा थोडा उत्तरेकडे उगवून तीन महिन्यांनीं उत्तर सीमेवर जातो. व नंतर पुन्हा दक्षिणेकडे वळू लागतो; तो सहा महि- न्यांनी दक्षिण सीमेवर जातो. या सहा महिन्यांना दक्षिणायन व हाणून पुढच्या -सहा महिन्यांना उत्तरायण ह्मणणें हा पहिला अर्थ व पूर्वेस उगवूं लागून उत्तरेकडे वळून सीमेवर गेल्यावर पुनः मार्गे वळून पूर्वेस उगवूं लागण्यास लागणाऱ्या सहा महिन्यांस उत्तरायण ह्मणणे हा दुसरा अर्थ. + ते. ब्रा. मुखं वा एतत् ऋतूनाम् । यद्वसंतः । ( १-१-२-६ ).