वेदकालनिर्णय असला पाहिजे. वेदांग ज्योतिषामध्यें संवत्सराला उत्तरायणापासून आरंभ केलेला आहे. व श्रौत सूत्रांमध्येही गवामयनादि वार्षिक सत्रांचा आरंभ तेव्हांपासूनच करावा असे सांगितले आहे. देव- संबंधी सर्व कर्मे उत्तरायणामध्येच केली पाहिजेत, असे जैमिन्यादिकांचें मत आहे. व कित्येक ज्योतिष ग्रंथांत दिल्याप्रमाणे उत्तरायण ह्मणजे मकर संक्रमणापासून कर्क संक्रमणापर्यंतचा काल होय. यावरून मकरसंक्रमण हा संवत्सराचा तसाच उत्तरायणामही जुन्या वैदिककाळी आरंभ असावा असे प्रथमदर्शनी कासि वाटेल, परंतु जरा सूक्ष्मपणें वार्षिक सत्रांतील प्रयोगांचे निरीक्षण केल्यास मकरसंक्रमण हा या सत्रांचा आरंभ नसला पाहिजे आढळून येईल. कारण पूर्वी सांगितलेच आहे की, विपुवदिनाच्या योगानें जसे वर्षाचे तसे विश्र्वान् दिवसाच्या योगानें वार्षिक सत्राचे दोन समान भाग होतात. सत्र है वर्षाचें प्रतिबिंबच होतें. व ह्मणून प्रथमतः तरी त्याचें वर्षाशी सर्वांशी साम्य असले पाहिजे. परंतु वरील कल्पनेप्रमाणे वर्षारंभ मकरसंक्रमणीं धरल्यास, विवान JAN दिवस खरोखर विपुव दिवशी म्हणजे संपात दिवशीं न येतां कर्क संक्रमणी येईल. व त्याचा अर्थ जो समान अहोरात्राचा दिवस तो निरर्थक होईल; परंतु असें ह्मणणे नीट नाहीं. कारण केव्हां तरी त्या शब्दाची योजना सार्थ होत असलीच पाहिजे. व हे गणे + वेदांग ज्योतिष ५ व आश्वलायन श्रौतसूत्र २-२-१४.३ व २२. $ ऐतरेय ब्राह्मण ४- २२ तैत्तिरीय ब्राह्मण १-२-३-१ तांड्य ब्राह्मण थोडा
पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/२६
Appearance