Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेदकालनिर्ण ठरविण्याचें साधन ह्मणजे रोज सकाळी सूर्याजवळ असलेल्या स्थिर तारका पहाणें हेंच होतें. सूर्यसिद्धांताच्या काळीं यद्यपि अन गतीचा शोध लागला होता, तरी त्यांत सौर वर्षमान नाक्षत्रच धरिलें आहे. व या गतीविषयीं कोणत्याही वैदिक ग्रंथांत प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष उल्लेख नाहींत. ह्मणून यज्ञ उर्फ संवत्सर हा आयनिक सौर नसून नाक्षत्र सौर होता, यांत संशय नाहीं. परंतु हें वर्षमान धरिल्यानें सुमार दर दोन हजार वर्षांनी ऋतुचक्राशी मेळ ठेवण्या- साठी वर्षारंभ बदलावा लागेल व अशा प्रकारचे फेरफार वर्षारंभांत खरोखरच केलेले आहेत; ही गोष्ट वरील विधानास ह्मणजे वर्षमान सांपातिक नसून नाक्षत्र होतें या म्हणण्यासच जास्त पुष्टी आणते. ● आतां हा वर्षारंभ केव्हां धरीत असत हे पहाणें आहे. वर सांगितलेंच आहे की संवत्सर व यज्ञ हे शब्द बहुतेक समाना- र्थकच होते. व ह्मणून त्या दोघांचा आरंभही अर्थात् एकदमच होत सांपातिक वर्ष नाक्षत्र वर्षापेक्षां स्थूलमानाने एका घटिकेने लहान आहे. ह्मणून आज जर चैत्रारंभी वसंत सुरू झाला तर सुमारे १८०० वर्षांनी किंवा अगर्दी स्थूल मानानें म्हटल्यास २००० वर्षांनीं तो फाल्गुनारंभी होऊं लागेल. म्हणून वर्षारंभ जर वसंतारंभी ठेवावयाचा असेल तर तो २००० वर्षांनी चैत्रांत न करतां फाल्गुनांत करावा लागेल व आणखी दोन हजार वर्षांनी माघांत करावा लागेल. अशा रीतीनें दर दोन हजार वर्षांनी वर्षारंभ एक एक महिना मार्गे आणावा लागेल. संपात चल आहेत व वसंतसंपातांत सूर्य येईल त्या वेळेस बसंत ऋतूस सुरुवात होते. म्हणजे एक ऋतुपर्यंत म्हणजे सांपातिकसौर वर्ष असा अर्थ झाला है स्पष्टच आहे.