Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेदका निर्णय. संवत्सरः प्रजापतिः ।" या तैत्तिरीय संहितेंतील वाक्यांवरून तर हें अगदीं उघड होतें. असो. आतां या संवत्सराचे ऊर्फ यज्ञाचे जे मुख्य भाग त्यांचं थोडंसें परीक्षण केले पाहिजे. कालमापनामध्ये मूल परिमाण सावन दिवस हें धरीत असत. अशा तीस सावन दिवसांचा एक महिना व अशा बारा महिन्यांचें ह्मणजे ३६० सावन दिवसांचें एक वर्ष होत असे. परंतु तुलनात्मक व्युत्पत्तिशास्त्रावरून प्राचीन आर्य लोक चंद्रावरूनच महिने ठरवीत असे दिसतें. परंतु तीस सावन दिवसांचा महिना चांद्र महिन्याबरोबर जमणें शक्य नाहीं. ह्मणून सावन व चांद्र महिन्यांचा मिलाफ करण्यासाठीं कांहीं सावन महिन्यांतून एक एक दिवस गाळीत असत. परंतु पुढें चांद्र * व सौर चर्पीचाही मिलाफ करणें जरूर पडलें; व त्यासाठी अधिक दिवस अथवा अधिक मास धरण्याची युक्ति प्राचीन आर्य लोकांनी काढिली होती, असे दिसतें. कारण तैत्तिरीय व वाजसनेयी संहितेमध्ये अधिक महिन्याचा उल्लेख असलेली बरीच वाक्यें आहेत. व ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळांतही, + " वेद मासो धृतव्रतो द्वादश प्रजावतः । वेदा य उपजायते । " असे झटले आहे. ही अधिक दिवस किंवा

  • बारा चांद्र मास ह्मणजे एक चांद्र वर्ष. चांद्र मासही दोन प्रकारचे असतात.

एका नक्षत्रांत आल्यापासून पुन्हा त्याच नक्षत्रांत यावयास जो काल लागतो तो नाक्षत्र मास, व एका अमवास्येपासून दुसऱ्या अमास्यपर्यंतचा जो काल त्यास अमा मास म्हणत.त. नेहमीं अमा मासच घ्यावयाचे असतात. ‡ ऋ. १.२५.८.