Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वेदकालनिर्णय. आतां या तजविजीचें बरोबर खरूप जरी समजलें नाहीं, तरी यज्ञ- यागसंबंधी ग्रंथांवरून इतकें दिसेल कीं, चंद्राचे वृद्धिक्षय, ऋतूंचे बदल व सूर्याची दक्षिण व उत्तर अशीं दोन अयनें ह्या त्या काळी कालमापनाच्या मुख्य मुख्य खुणा होत्या. दुसरी विशेष गोष्ट अशी आहे कीं, जुने याग किंवा सत्रे यांतील मुख्य गोष्टी व संव- त्सरांतील मुख्य गोष्टी या एकच आहेत. हीं सत्रें एक एक वर्षाची असत व तीं सूर्याच्या वार्षिक गतीच्या अनुरोधानेंच केवळ बसविलेलीं असत. त्यांचे सहा सहा महिन्याचे दोन भाग करून प्रत्येक महिन्याला तीस तसि दिवस दिलेले असत. या दोन भागांच्या बरोबर मध्ये विषूवान् म्हणजे मध्य दिवस अथवा विषुव दिन हा असे. यावरून असे उघड दिसतें कीं वैदिक ऋषींनी आपलें पंचांग मुख्यत्वेंकरून यागकर्मासाठींच केलें होतें, व तसेंच यज्ञयागांच्या नियमित करण्याच्या योगानें पंचांगाची व्यवस्थाही बरोबर रहात असे. या वार्षिक सत्रांमध्ये आहुतीचे काल म्हणजे रोजचे प्रातःकाळ व सायंकाळ, दर्शमास, पूर्णमास व प्रत्येक ऋतूचा व अयनाचा आरंभ हे होते.* अशा रीतीनें सत्र पुरें झालें म्हणजे वर्षही पुरे होत असे. व ह्मणून संवत्सर व यज्ञ हे दोन शब्द बहुतेक समानार्थकच झाले होते. " संवत्सरः प्रजापतिः । " प्रजापतिज्ञः । " या ऐतरेय ब्राह्मणांतील व " यज्ञो वै प्रजापतिः ।

  • पहा - बौधायन सूत्र २-४-२३, मनुस्मृति ४ २५, २६.

! ऐतरेय ब्राह्मण २-७; ४-२२ तैत्तिरीय संहिता २-५-७-३ आणि ७.५- ७-४ तसंच ७-२-१०-३.