वेदकालनिर्णय. वेदकालाचा निर्णय करण्याकरितां ज्या वेदवाक्यांचा आधार घ्यावयाचा तीं कशा प्रकारची असतील, हें थोडे पाहिले पाहिजे. वेदकाळीं आतांच्या सारखीं वेधयंत्रें नव्हतीं हें स्पष्टच आहे. अर्थात् त्या वेळी फक्त डोळ्यांनींच जें दिसेल त्यावरून सर्व अनुमानें बांधावी लागत. ह्मणून त्या डोळ्यांच्या वेधांमध्ये सूक्ष्म गणिताची गरज मुळींच नव्हती. अगदीं ढोबळ प्रमाणावरच सर्व गणित होतें. अर्थात् वर्षमानही आतांच्या इतकें सूक्ष्म नव्हतें. वर्षीतील निरनिराळे काळ ह्मणजे ऋतु यांचें एक चक्र संपून दुसरें सुरु झाले ह्मणजे दुसरें वर्षही चालू होत असे. त्या वेळीं कालमान सर्व लोकांस समजण्यासाठीं आतांच्या प्रमाणे पंचांगाची व्यवस्था नव्हती. तरी कांहीं तरी तसें साधन त्या लोकांनी करून ठेविलें होतं यांत संशय नाहीं. कालमापनाच्या ज्या हल्लीं सावन, चांद्र, नाक्षत्र, सौर अशा रीती आहेत, त्याचा वैदिक ग्रंथांमध्ये कोठेही उल्लेख नाहीं व वेदांगज्योतिषाखेरीज दुसरा कोणताही पंचांग साधनावर जुना ग्रंथ नाहीं. यासाठी त्यांची कालमापनाची रीति कशी होती हैं फक्त कित्येक वेदांतील उल्लेखांवरून अथवा यज्ञ- ग्रंथांत वर्णन केलेल्या जुन्या दंतकथांवरूनच समजून घेतले पाहिजे. ऋग्वेदांतील कित्येक यागसूक्तांवरून यज्ञयागपद्धती त्या वेळी बरीच प्रौढ दशेस आली होती, हे उघड दिसतें, व इतकी स्थिति महिने, ऋतु व वर्ष यांचें चांगले ज्ञान झाल्याशिवाय होणें संभव- नीय दिसत नाही. यासाठी त्या वेळीं कालनिश्चय करण्यासाठीं कांहीं तरी वैदिक ऋषींनी तजवीज करून ठेविली असलीच पाहिजे. .
पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/२१
Appearance