,
पाणिनचे वेळीं होता असे काहीं म्हणता येत नाहीं. म्हणून
त्याचा “ खालची " असा व्युत्पत्तीवरून निघणारा अर्थ घेणेंच
योग्य आहे. शिवाय या सूक्ताच्या आंकडकडव्यांत उत्तर हा
जो शब्द आला आहे त्याचा व नेदीयस् याचा विरोध अशा री-
तीनें चांगला जमेल. — इन्द्राचें घर उत्तरेकडे आहे व वृषाकपि
नेदर्दायस् म्हणजे खालीं चालला आहे; आणि इन्द्र त्याला आपल्या
घरीं पुनः बोलावितो आहे; ' हा या सूक्ताचा मथितार्थ होय.
शरत्संपाताजवळून सूर्य खालीं पडण्याचा संभव असतो अशी
कल्पना फार पुरातन आहे. ऐतरेय ब्राम्हण ( ४–१८) आणि
तैत्तिरीय ब्राम्हण ( १–५ - १२ - १ ) यांत संवत्सर सत्रांतील विषुव
दिवशीं करावयाचे विधि सांगितले आहेत. त्यांत " तस्य वै देवा
आदित्यस्य स्वर्गाल्लोकादवपातादबिभयुस्तं त्रिभिः स्वर्गैलेकैर
वस्तात्प्रत्युत्तभ्नुवन् । तेषु ( स्तोमेषु ) हि वा एष एत-
दध्याहितस्तपति । स वा एष उत्तरोऽस्मात्सर्वस्माद्भूतात् ।"
असें झटले आहे. " सूर्य स्वर्गीतून खालीं पडेल ह्मणून देव
भ्याले व त्यानीं त्याला खालून स्तोमानी आधार दिला.... या
प्रमाणें आधार मिळाल्यामुळे तो सर्वोहून उत्तर ( वरचा ) झाला. "
हे स्तोम शरत्संपातदिवशीं ह्मणजे विषुवदिवशीं दिले आहेत.
या सर्व गोष्टींवरून प्रस्तुत ऋचेंतही सूर्याच्या दक्षिण गोलार्धात
उतरण्याचेंच वर्णन आहे व इन्द्र वृषाकपीला म्हणजे सूर्याला पुनः
आपलेकडे म्हणजे उत्तरेकडे बोलावितो आहे असे दिसतें . )