Jump to content

पान:वेदकालनिर्णय १९०८.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११३

वेदकालनिर्णय.


या एकाच मूळरूपापासून झाले आहेत व म्हणून नेदीयस् याचा अर्थ खालचा असाच केला पाहिजे. असा अर्थ करावयास दुसराही आधार आहे. ऋग्वेदांत इतर ठिकाणी आलेल्या नेदीयस्व नेदिष्ठ श- ब्दांवरून त्यांचा असा अर्थ जरी निश्चित करता येत नाहीं, तरी ब्राह्मणांतील कांहीं स्थलांवरून तो तसा निश्चित करता येतो. ऐतरेय ब्राह्मणांत ( ६ - २७ ) “ उपरिष्टान्नेदीयसि " यांत उप- रिष्टात् व नेदीयस् यांत विरोध दाखविला आहे. तसेच काठक संहितेंत " नेदिष्ठादेव स्वर्गलोकमारोहति ।" ह्मणजे 'नेदिष्ठ लोकाहून स्वर्गलोकांत आरोहण करितो' असें वाक्य आहे. या आरोहण शब्दावरून नेदिष्ठ ह्मणजे खालचा लोक असा अर्थ उघड दिसतो. तांड्य ब्राह्मणांतही " यथा महावृक्षस्याग्रं सृप्त्वा नेदीयः संक्रमात् संक्रामत्येवमेतन्नेदीयः संक्रमया नेदीयः संक्रमा- त्संक्रामति ।" ह्मणजे “ज्यांप्रमाणें वृक्षाच्या अग्रभाग हळूहळू गेल्यावर ( मनुष्य ) हळूहळू खालीं येतो त्याप्रमाणें स्वर हळूहळू उंच करून मग क्रमानें खालीं आणितो " असे वाक्य आले आहे. या सर्व ठिकाणीं नेदीयस् याचा ' जवळचा ' असा अर्थ सायणा- चार्यानीं पाणिनीला अनुसरून केला आहे. पण वर सांगितल्या- प्रमाण पाणिनीचा उद्देश अर्थ सांगण्याचा नसून रूप सिद्ध कर ण्याचा आहे. नेदीयस् या ईयस्प्रत्ययान्त शब्दाचें मूळरूप कांहीं आढळले नाहीं, एवढ्यावरून त्यानें अन्तिक ह्या त्याच्या एका अर्थाने समान असलेल्या शब्दाला त्याचे मूळरूपं असें मानिर्ल. यावरून नेदीयस् याचा अन्तिक ह्मणजे जवळचा एवढाच अर्थ